एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत 15 दवाखाने रात्री सुरु ठेवण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी
पालिकेचे दवाखाने सायंकाळी बंद असल्याने मोठ्या रुग्णालयाकडे धाव घेतली जात असल्याने मोठ्या रुग्णालयावरील भार वाढतो. मोठ्या रुग्णालयांवरील भार कमी करता यावा म्हणून पालिकेचे 15 महत्त्वाचे दवाखाने आता दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई : मुंबईत रात्रीच्या वेळीही सहज आरोग्य सुविधा मिळणार आहे. शहरातील 15 दवाखाने रात्री सुद्धा सुरू ठेवण्याच्या प्रस्तावाला अखेर स्थायी समितीची मंजुरी दिली आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयात आणि दवाखान्यात स्वस्त व चांगले उपचार होत असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
महापालिकेचे दवाखाने सायंकाळी बंद असल्याने मोठ्या रुग्णालयाकडे धाव घेतली जात असल्याने मोठ्या रुग्णालयावरील भार वाढतो. मोठ्या रुग्णालयांवरील भार कमी करता यावा म्हणून पालिकेचे 15 महत्त्वाचे दवाखाने आता दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याला आज पालिका सभागृहाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता मुंबईकरांना उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याची गरज नाही.
रात्री सुरु असणाऱ्या 15 दवाखान्यांची नावे
ए विभाग - कुलाबा म्युनिसिपल दवाखाना
बी विभाग - वालपाखाडी दवाखाना
डी विभाग - बाने कंपाऊंड दवाखाना
ई विभाग - साऊटर स्ट्रीट दवाखाना
एफ/नॉर्थ - रावळी कॅम्प, वडाळा दवाखाना
जी/साऊथ - बीडीडी चाळ दवाखाना
एच/ईस्ट - कलिना दवाखाना
एच/वेस्ट - ओल्ड खार दवाखाना
के/वेस्ट - एन. जे. वाडिया दवाखाना
पी/नॉर्थ - चौक्सी दवाखाना
आर सेंट्रल - गोराई म्हाडा दवाखाना
एल विभाग - चुनाभट्टी दवाखाना
एन विभाग - रमाबाई आंबेडकर दवाखाना
एस विभाग -कांजूर व्हिलेज दवाखाना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement