एक्स्प्लोर

मुंबईत एका झाड लावण्यासाठी किमान 59 हजार रुपयांचा खर्च, 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प महापालिकेला डोईजड

या 33 कोटी झाडांच्या लागवडीच्या अंतर्गत शासनाने मुंबई महापालिकेला त्यांच्या हद्दीत किमान 5977 झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र सध्या मुंबईत पालिकेला 5977 झाडांची लागवड करण्यासाठी जागेची टंचाई भासत आहे.

मुंबई : मागील देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेला 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प मुंबई महापालिकेला डोईजड झाला आहे. भाजप सरकारच्या काळात आखलेल्या योजनेनुसार मुंबईत मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण होणार आहे. 5,977 वृक्षांसाठी ३५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यानुसार एका झाड लावण्यासाठी किमान 59 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे, पालिकेच्या खांद्यावर 35 कोटींचा आर्थिक भार येणाक आहे. मात्र, भाजप सरकारच्या काळातल्या या योजनेला अद्याप पालिकेकडून हिरवा कंदील देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात सत्तेवर असताना भाजप सरकारने संपूर्ण राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड करण्याची योजना आखली होती. विधानसभा निवडणूक निकालानंतर आता भाजप सरकार पायउतार झाले आहे. मात्र मुंबईत मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण 5977 वृक्षांच्या लागवडीसाठी येणारा तब्बल 35 कोटी रुपयांचा खर्च पालिकेच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे पालिका जवळजवळ एका वृक्षाच्या लागवडीवर तब्बल 59 हजार रुपये खर्चण्यात येणार आहे. तर दुसरीकडे भाजप सरकारच्या कालावधीतच मेट्रो रेल्वे कारशेडसाठी 2200 झाडांची एका रात्रीत कत्तल करण्यात आली होती. त्यामुळे झाडांची कत्तल करणाऱ्या पालिकेकडूनच आता नव्याने झाडांची लागवड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मियावाकी पद्धतीच्या वृक्षारोपणाबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. राज्य शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी राज्यभरात 33 कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला होता. या 33 कोटी झाडांच्या लागवडीच्या अंतर्गत शासनाने मुंबई महापालिकेला त्यांच्या हद्दीत किमान 5977 झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र सध्या मुंबईत पालिकेला 5977 झाडांची लागवड करण्यासाठी जागेची टंचाई भासत आहे. त्यामुळे पालिकेने कमी जागेत अधिक वृक्षारोपण होणाऱ्या मियावाकी पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनुभवी दोन कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येणार आहे. हे कंत्राटदार पालिकेच्या सल्लागार आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करणार आहेत. शहर व पूर्व आणि पश्चिम उपनगरे भागातील, एफ/दक्षिण, एच / पूर्व, के/ पूर्व, के/ पश्चिम, पी/ दक्षिण, पी/ उत्तर, आर / दक्षिण, आर/ उत्तर , एल, एम/ पश्चिम, एम / पूर्व, एन, एस, आणि टी या विभागात 5977 अथवा त्यापेक्षाही काही अधिक झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी मे.अर्थ साल्वेजिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या कंत्राटदाराला 14.74 कोटी रुपयांचे तर मे. एस्सीबी एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला 20.69 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे. मात्र, या विषयावर सादरीकरण करण्याचे आदेश स्थायी समितीनं प्रशासनाला दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा द्या नाहीतर, आम्ही सोडणार नाही, ठाकरेंच्या आमदाचा अधिकाऱ्यांना थेट इशारा
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा द्या नाहीतर, आम्ही सोडणार नाही, ठाकरेंच्या आमदाचा अधिकाऱ्यांना थेट इशारा
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
Embed widget