एक्स्प्लोर

Voter List : राज्यात सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक, डोळे विस्फारणारी आकडेवारी

Mumbai : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Mumbai : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत. पुण्यात 82 लाखांहून अधिक मतदारांची संख्या आहे. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष  मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
 
पुण्याची एकूण मतदार संख्या 82 लाख 82 हजार 363 इतकी आहे. तर मुंबई उपनगरची एकूण मतदार संख्या 73 लाख 56 हजार ५९६ इतकी आहे. ठाण्याची एकूण मतदार संख्या 65 लाख 79 हजार 588, नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 48 लाख 8 हजार 499 इतकी आहे. तर नागपूरची एकूण मतदार संख्या 42 लाख 72 हजार 366 एवढी आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती मतदार 

चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक आहेत. रत्नागिरीची एकूण मतदार संख्या 13लाख 3 हजार 939 असून यामध्ये 11 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 31 हजार 12 आहे. तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 72 हजार  916 इतकी आहे. नंदुरबारची एकूण मतदार संख्या १२ लाख ७६ हजार ९४१ असून यामध्ये १२ तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 37 हजार 609 आहे तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 39 हजार 302 इतकी आहे. गोदिंया जिल्ह्यातही महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गोंदियाची एकूण मतदार संख्या 10 लाख 92 हजार 546 असून यामध्ये तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 41 हजार 272 आहेत, तर हे तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 51 हजार 264  इतकी आहे. सिंधुदुर्गची एकूण मतदार संख्या 6 लाख 62 हजार 745 असून यामध्ये 1 तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 3 लाख 30 हजार 719 आहे तर महिला मतदारांची संख्या 3 लाख 32 हजार 25 इतकी आहे.
            
राज्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. राज्यात 8 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 9 कोटी 24 लाख 91 हजार 806 मतदारांची नोंद आहे. यामध्ये 4 कोटी 80 लाख 81 हजार 638 पुरुष मतदार तर 4 कोटी 44 लाख 4 हजार 551 महिला मतदार आणि 5 हजार 617 तृतीयपंथी मतदार आहेत.

5 जिल्ह्यात 30 लाखांहून अधिक मतदार

अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. अहमदनगरमध्ये एकूण मतदार ३६ लाख 47 हजार 252 आहेत. सोलापूरमध्ये एकूण मतदार 36 लाख 47 हजार 141 आहेत. जळगावमध्ये एकूण मतदार 35 लाख 22 हजार 289 आहेत. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार 31 लाख 72 हजार 797 आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण मतदार 30 लाख 48 हजार 445 आहेत. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या 10 जिल्ह्यांमध्ये 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

Amit Shah : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस, तीन तिघाडा काम बिघाडा; नांदेंडमध्ये अमित शाहांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषणABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 11 November 2024Muddyach Bola Worli : ठाकरे गड राखणार की इंजिन एंट्री करणार? वरळीकरांच्या मनात नेमकं कोण?ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 11 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
Aaditya Thackeray : महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
Embed widget