एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amit Shah : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस, तीन तिघाडा काम बिघाडा; नांदेडमध्ये अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah Nanded Sabha : शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी आतापर्यंत काय काम केलं याचा हिशोब द्यावा असं सांगत राज्याचा विकास हा फक्त मोदीच करू शकतात असा दावा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केला. 

नांदेड: महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत, पण तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती असल्याची जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. महाराष्ट्राचा विकास हे तीन पक्ष करू शकत नाहीत, हे काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल तर भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना निवडून द्या असं आवाहन अमित शाह यांनी केलं. अमित शाह हे नांदेडमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी आले होते. 

अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्रात तीन नकली पक्ष एकत्र आले आहेत. नकली उद्धव सेना, शरद पवार आणि उरलेली काँग्रेस असे तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती आहे. या तिघांची ऑटो आहे, मात्र यांचे काही खरे नाही. शरद पवार हे दहा वर्षे केंद्रात मंत्री होते, पण त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं याचा हिशोब द्यावा. 

काय म्हणाले अमित शाह?

वातावरण बिघडले आहे असे काँग्रेसवाल्यांना वाटते, मात्र नांदेडमध्ये भाजपचेचे वातावरण आहे. ही निवडणूक मोदींना पंत्रप्रधान करण्याची आहे. प्रतापराव यांना मत म्हणजे मोदींना मत. मनमोहन सिंग यांनी आपली अर्थव्यवस्था 11 व्या नंबरला सोडून गेले होते ती आज पाचव्या स्थानावर आली आहे. 

मोदींनी शत्रूंना घरात घुसून मारलं

खर्गे म्हणतात काश्मीरचा अन् महाराष्ट्राचा काय संबंध? पण काश्मीर हे पूर्ण देशाचं आहे, याच्या सुरक्षेसाठी नांदेडचा तरूण तयार आहे. काँग्रेसने 70 वर्षात 370 कलम हटवले नाही. दहा वर्ष मनमोहन सोनिया यांनी सरकार चालवले, तेव्हा बाहेरून लोक यायचे अन् इथे घातपात करायचे. मोदींच्या काळात पुलवामा हल्ला झाला, मात्र मोदींनी त्यांच्या घरात्त घुसून त्यांना मारले. जगाला मोदींनी मोठा संदेश दिला आहे, आमच्या वाटेला जर कुणी आला तर आम्ही त्याला सोडणार नाही 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

मोदींच इंजिन अन् आपली विकासाची गाडी आहे. दुसरीकडे गाडी आहे पण राहुल गांधींचं बंद पडलेलं इंजिन त्याला जोडलेलं आहे. सगळेच म्हणतात मी इंजिन आहे, पण इंजिनमध्ये एकाच ड्रायव्हरची जागा असते. ती गाडी आपल्याला विकासाकडे घेऊन जात नाही . आपली मोदींची गाडी हीच विकासाची गाडी आहे.  

अशोकराव तुम्ही इकडे आले आणि बघा काँग्रेसची अवस्था काय झाली आहे. दोघे ही इथे एकत्र आलेत त्यामुळे आता चिंता नाही. सामान्य माणसांना विकासाकडे घेऊन जायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा जाहीर केली हे काँग्रेसला माहितीच नाही. मागच्या लोकसभेत  काँग्रेसची एक जागा आली होती, आता त्यांना शून्यावर आणायचं आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP MajhaZero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP MajhaZero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP MajhaJob Majha | कोल इंडिया लिमिटेडमध्ये मायनिंग पदासाठी 236 जागांवर भरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget