एक्स्प्लोर

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं जलयुक्त शिवार शेतकऱ्यांच्या मुळावर

बीडः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वरदान ठरलेली शासनाची जलयुक्त शिवार योजना आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे जलयुक्त शिवार योजनेतील बंधारा पहिल्याच पावसात फुटून तब्बल 250 एकर शेतीचं नुकसान झालं आहे.   गेवराई तालुक्यातील भेंड इथे ही घटना घडली आहे. बंधारा तयार करत असताना खोद काम केलेली माती ठेकेदाराने न काढल्यामुळं ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. बंधाऱ्याच्या बाजुची माती तत्काळ काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र ठेकेदाराने माती काढलीच नसल्याचं उघड झाले आहे.   प्रशासनाचा हलगर्जीपणा बंधाऱ्यातील पाण्याचा विसर्ग येवढा प्रचंड होता की, काही क्षणातच संपूर्ण शेतातील माती आणि नव्याने पेरलेली बियाणे वाहुन गेली आहेत. चार वर्ष दुष्काळाशी झुंज देत असताना यंदा पाऊस चांगला आहे, म्हणून बळीराजा मोठ्या उत्साहाने कामाला लागला आहे. मात्र बंधाऱ्याच्या पाण्यामुळे इथला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.   दरम्यान गेवराईचे तहसीलदार संजय पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. घटना घडल्यानंतर ठेकेदाराने गावातुन पळ काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरलेली योजना शेतकऱ्यांसाठीच कर्दनकाळ ठरु नये, यासाठीही प्रशासनाने काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर योग्य कारवाई करण्याची मागणीही शेतकरी करत आहेत.  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोपVijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी

युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?

Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल

Embed widget