एक्स्प्लोर

Trending : 'हे' आहे जगातील सर्वात महागडं घर; एका महिन्याचं भाडं इतकं, किंमत ऐकून व्हाल थक्क

Trending News : बकिंगहॅम पॅलेस (Buckingham Palace) ही ब्रिटिश राजघराण्याची निवासी मालमत्ता आहे. 775 खोल्या असलेलं बकिंगहॅम पॅलेस खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.3 अब्ज पौंड खर्च करावे लागतील.

Buckingham Palace : ब्रिटनचे (Britain) राजघराणे (Royal Family) अनेकदा चर्चेत असतेच पण लोकांना त्यांच्या राजवाड्याबद्दल बकिंगहॅम पॅलेसबाबतही (Buckingham Palace) खास आकर्षण वाटते. वृत्तानुसार, ब्रिटीश राजघराण्याचे निवासस्थान असलेलं बकिंघम पॅलेस हे जगातील सर्वात महागडं घर आहे. आता या महालाबाबतचा एक अभ्यास समोर आला आहे. ब्रिटनच्या राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान असलेले बकिंगहॅम पॅलेस खरेदी करताना किंवा भाड्याने देताना तुमचा खिशाला किती झळ बसेल याचा अंदाज या अहवालावरून तुम्हांला येईल.

बकिंगहॅम पॅलेस ही ब्रिटिश राजघराण्याची निवासी मालमत्ता आहे. हा राजवाडा विक्रीसाठी आणि भाड्याने देण्यासाठी उपलब्ध नाही. दरम्यान, या संदर्भातील एक अभ्यास समोर आला आहे. 'मॅककार्थी स्टोन'च्या (McCarthy Stone) अभ्यासानुसार, 775 खोल्या असलेलं बकिंगहॅम पॅलेस खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.3 अब्ज पौंड खर्च येईल. यामध्ये कोरोना महामारीपूर्वीच्या किमतीच्या तुलनेत 100 दशलक्ष पौंडची वाढ झाली आहे.

रिटायरमेंट प्रॉपर्टी डेव्हलपर्सच्या अंदाजानुसार, 2022 मध्ये ब्रिटनच्या शाही मालमत्तेची एकूण किंमत 3.7 अब्ज पौंडपर्यंत पोहोचेल. यामध्ये 2019 नंतर 46 दशलक्ष पौंड इतकी वाढ झाली आहे. ब्रिटनच्या शाही संपत्तीमध्ये देशभरातील राजवाडे आणि विश्रामगृहांचा समावेश आहे. या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, जर राजघराण्याला बकिंगहॅम पॅलेस भाड्यानं द्यायचा असेल तर त्याचं भाडं दरमहा 2.6 दशलक्ष पौंड असू शकतं. ही किंमती मालमत्तेचा आकार, खोल्यांची संख्या आणि स्थान यावर आधारित आहेत. 

अभ्यासासाठी पुनरावलोकन केलेल्या मालमत्तांपैकी कोणतीही मालमत्ता विक्रीसाठी किंवा भाड्यानं उपलब्ध नाही. राजेशाही मालमत्ता ही हाऊस ऑफ विंडसरची वैयक्तिक मालमत्ता नाही. ही ब्रिटनची मालमत्ता आहे, ही ट्रस्ट अंतर्गत येते. लवकरच ब्रिटनमध्ये राणीचा 70 वा वाढदिवस (Platinum Jubilee) साजरा करण्यात येणार असून त्याची तयारी सुरु आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget