Trending News : कौतुकास्पद! कच्छमधील उन्हामुळे वृद्ध महिला पडली बेशुद्ध; महिला पोलीस कॉन्स्टेबल आली मदतीला धावून
सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
Trending News : सध्ये अनेक राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. काही राज्यांमध्ये 40 अंशापेक्षा जास्त तापमान झालं आहे. उन्हामुळे अनेक लोक घराच्या बाहेर देखील जात नाहित. उन्हामध्ये फिरल्यामुळे अनेक लोक बेशुद्ध देखील पडतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक महिला पोलीस कॉन्स्टेबल एका वृद्ध महिलेची मदत करताना दिसत आहे.
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'गुजरातमधील वर्षा परमार या महिला कॉन्स्टेबलने कच्छमधील एका 86 वर्षीय महिलेची तब्येती बिघडल्यामुळे त्यांना पाठीवर उचलले. कच्छच्या रणमध्ये 5 किमी चालून वर्षा यांनी त्या वृद्ध महिलेला सुरक्षित ठिकाणी सोडले. ' अवनीश यांनी कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी देखील शेअर केलं आहे.
गुजरात की एक महिला कांस्टेबल वर्षा परमार ने कच्छ में 86 वर्षीय बुजुर्ग को स्वास्थ्य परेशानी होने के कारण पीठ पर उठाया और तपते रण में 5 किलोमीटर चलकर सुरक्षित स्थान तक पहुंचाया.❤️ pic.twitter.com/6yBResR7DP
— Awanish Sharan (@AwanishSharan) April 26, 2022
फोटोमध्ये ती वृद्ध महिला वर्षा परमार यांच्या पाठीवर बसलेली दिसत आहे. फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट केली आहे. तसेच अनेकांनी अवनीश शरण यांनी शेअर केलेलं ट्वीट रिट्वीट केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Viral Video : सिंहीणीचा शिकारीचा डाव फसला, म्हशींनी केलं धोबीपछाड; पाहा थक्क करणारा व्हिडीओ
- Viral Video : अचानक आकाशातून समुद्रात कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ
- Viral : माकडाकडून तीन वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, पुढे काय झालं पाहा...