World News: महिलेचे चक्क भूताशी प्रेमसंबंध; 20 वर्षांनंतर 'या' कारणामुळे झाला ब्रेकअप
World News: कोलंबियामध्ये राहणाऱ्या एका महिलेने खळबळजनक दावा केला आहे. या महिलेचं म्हणणं आहे की, तिला एका भूताशी प्रेम झालं होतं. पण आता तब्बल 20 वर्षांनंतर या दोघांचा ब्रेकअप झाला आहे.
![World News: महिलेचे चक्क भूताशी प्रेमसंबंध; 20 वर्षांनंतर 'या' कारणामुळे झाला ब्रेकअप Weird news marathi columbia woman paola florez claim ghost relationship for 20 years World News: महिलेचे चक्क भूताशी प्रेमसंबंध; 20 वर्षांनंतर 'या' कारणामुळे झाला ब्रेकअप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/850a865323e3effddd2c5ebc56412f391696322123892713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
World News: माणसांना माणसांशी प्रेम (Love) होणं हे नैसर्गिक आहे, हे कोणी बदलू शकत नाही. आजच्या युगात महिलांचं (Women) महिलांच्या प्रेमात पडणं, पुरुषांचं (Men) पुरुषांच्या प्रेमात पडणं देखील सामान्य झालं आहे. मुळात समलिंगी प्रेमसंबंधांना देखील आता जग (World) हळूहळू स्वीकारु लागलं आहे. पण जर एखाद्या महिलेने तुम्हाला सांगितलं की, तिचं भुतावर (Ghost) प्रेम आहे, तर? तेही केवळ एक-दोन वर्ष नाही, तर तब्बल 20 वर्षांपासून.
ही हादरवणारी घटना दक्षिण अमेरिकन देश कोलंबियातून (Columbia) समोर आली आहे. या महिलेचे चक्क भूताशी प्रेमसंबंध असल्याचा दावा तिने केला. पण पुढे काही कारणास्तव 20 वर्षांनंतर त्या दोघांचा ब्रेकअप झाला.
नेमकं प्रकरण काय?
कोलंबियात राहणारी महिला पाओला फ्लोरेज हिने नॅशनल टिव्हीवर येऊन या गोष्टीचा खुलासा केला की, ती भुताच्या प्रेमात पडली होती. पण 20 वर्षांनंतर जेव्हा तिने या भुताचा चेहरा पाहिला तेव्हा ती घाबरली आणि तिने त्याच्याशी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.
तथापि, मानसशास्त्रज्ञ मार्टिजा मोन्चालेग्री म्हणतात की, पाओलाचा हा दावा साधारण नाही. खरं तर, भूत आणि पिशाच्च यांच्याशी संबंध असलेल्या फार कमी घटना समोर येतात. त्यामुळे या दाव्यावर मानसशास्त्रज्ञांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.
लहानपणापासून आहे भुताच्या प्रेमात
पाओला फ्लोरेजने सांगितलं की, ती अगदी लहान असल्यापासून तिचे भुताशी प्रेमसंबंध आहेत. जवळपास 20 वर्षं ती भुतासोबत रिलेशनशिपमध्ये होती, हे दोघं रात्री एकमेकांसोबत झोपायचे सुद्धा. या महिलेने तिचे भुताशी शारिरीक संबंध असल्याचा दावा देखील केला आहे.
महिलेने दावा केला की, 20 वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर एके दिवशी अचानक तिने भुताचा चेहरा पाहिला. पाओला म्हणाली की, त्या भुताचे मोठे-मोठे दात होते आणि त्याचा चेहरा एखाद्या शैतानासारखा होता, जो तिला आवडला नाही.
भुताचा चेहरा पाहिल्यावर बदललं मन
कोलंबियन महिलेचं म्हणणं आहे की, ज्या रात्री तिने भुताचा चेहरा पाहिला त्याच रात्री तिने ठरवलं की, तिला या भुताशी यापुढे संबंध ठेवायचे नाहीत. पाओलाने सांगितलं की, जेव्हा ती पहिल्यांदा भुताला भेटली तेव्हा त्याने तिचा हात धरला आणि नंतर तिच्या जवळ येऊ लागला. भुताच्या अशा वागण्यामुळे सुरुवातीला ती घाबरली होती. पण त्यानंतर ते भूत रात्री पाओलासोबत येऊन झोपायला लागलं. या महिलेला देखील भुतासोबत मज्जा यायची, असं तिने सांगितलं. पण भुताचा चेहरा पाहून पाओलाने तिचं मन बदललं.
हेही वाचा:
VIDEO: नवऱ्याला जीवे मारण्यासाठी रचला कट; कॉफीमध्ये मिसळलं ‘ब्लीच’, धक्कादायक व्हिडीओ समोर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)