Viral Video : भरधाव जाणाऱ्या ट्रकला धडकला गेंडा, व्हिडीओ पाहून लोक संतापले, आसामच्या CM यांनी दिली प्रतिक्रिया
Viral Video : रस्ता ओलांडताना वाहने, ट्रक इत्यादींची धडक बसून बिबट्यापासून हरणासारखे अनेक प्राणी जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो, जी चिंतेची बाब आहे,
Viral Video : भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे जनावरांचा (Animals) जीव धोक्यात आहे. राष्ट्रीय महामार्गापासून ते अॅनिमल कॉरिडॉरपर्यंत काही वाहनचालक एवढ्या बेसावधपणे वाहने चालवतात की, त्याचा फटका प्राण्यांना सहन करावा लागतो. रस्ता ओलांडताना वाहने, ट्रक इत्यादींची धडक बसून बिबट्यापासून हरणासारखे अनेक प्राणी जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय,
'या' घटनेबाबत लोकांमध्ये संताप
सोशल मीडीयावर व्हायरल होणारा व्हिडीओ आसाममधला आहे, जिथे एक ट्रक रस्ता ओलांडणाऱ्या गेंड्यावर धडकला. एवढंच नाही तर गेंडयाला मारल्यानंतर तो निराधार प्राण्याला तसंच सोडून पळून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त होत असून, लोकांनी सावधपणे वाहने चालवावे, असे नेटकरी सांगत आहेत.
Rhinos are our special friends; we’ll not allow any infringement on their space.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) October 9, 2022
In this unfortunate incident at Haldibari the Rhino survived; vehicle intercepted & fined. Meanwhile in our resolve to save animals at Kaziranga we’re working on a special 32-km elevated corridor. pic.twitter.com/z2aOPKgHsx
काय आहे व्हिडीओमध्ये?
हा व्हिडीओ 10 सेकंदाचा आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की, एक गेंडा जंगलातून बाहेर पडतो आणि रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी धावतो तेव्हा वेगवान ट्रक चालक वाहन थांबवण्याऐवजी गेंड्यावर धडकतो आणि पळून जातो. अशा स्थितीत गेंडा जखमी होऊन रस्त्यावर पडतो. त्यानंतर, तो कसा तरी पुन्हा उठतो, पण घाबरून पुन्हा पडतो. शेवटी तो हिंमत करून त्याच्या पायावर उभा राहतो आणि जिथून तो निघाला होता त्या जंगलात परत जातो.
5 लाखांहून अधिक व्ह्यूज
या घटनेचा व्हिडिओ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर शेअर केला होता. ते कॅप्शनमध्ये म्हणाले, 'गेंडे आमचे खास मित्र आहेत; आम्ही कुणालाही त्यांच्यावर अत्याचार करू देणार नाही. आम्ही काझीरंगा (नॅशनल पार्क) मधील प्राण्यांना वाचवण्याच्या संकल्पानुसार 32 किमीच्या 'स्पेशल एलिव्हेटेड कॉरिडॉर'वर काम करत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटला 22 हजारांहून अधिक लाईक्स आणि 5 लाख 85 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
अशा भागातून हळू जा, नेटकऱ्यांचे आवाहन
IFS अधिकारी परवीन कासवान यांनीही ही क्लिप ट्वीट केली आणि लिहिले - मित्रांनो, आपण अॅनिमल कॉरिडॉरमधून जाताना काळजी घेऊ शकतो. हा व्हिडीओ आसाममधील हल्दीबारी अॅनिमल कॉरिडॉरमधील आहे. त्याचप्रमाणे, अनेक युजर्सनी वाहनचालकांना अशा भागात सावकाश जाण्याचा सल्ला दिला, तर इतर युजर्सनी लिहिले की, जर आम्हाला प्राण्यांची काळजी असली असती, तर आतापर्यंत काहीतरी उपाय काढला असता. तर एका यूजरने लिहिले की, मानव सतत प्राण्यांच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे, अशा परिस्थितीत प्राण्यांचे जीवन संकटात सापडले आहे.
हेही वाचा>
Viral Video: 36 पैकी 36 गुण मिळालेल्या वधू-वरांमध्ये जोरदार मारामारी, लग्नसोहळा बनला युद्धाचा आखाडा! व्हिडीओ व्हायरल