Viral Video: प्रवासात डुलकी घेणे पडेल भारी, घडलेल्या प्रकारामुळे लोकं हैराण! हा व्हिडीओ एकदा पाहाच
Viral Video : प्रवासात झोप लागणे हे अगदी सामान्य आहे. बहुतेक लोकांना प्रवासात डुलकी घेणे आवडते. मात्र प्रवास करताना कधीकधी झोप घेणे धोकादायक ठरू शकते.
Viral Video : प्रवासात झोप लागणे हे अगदी सामान्य आहे. बहुतेक लोकांना प्रवासात डुलकी घेणे आवडते. मात्र प्रवास करताना कधीकधी झोप घेणे धोकादायक ठरू शकते. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पण तरीही असे करणं लोक टाळत नाहीत, आणि त्यांच्या जीवाशी खेळ होतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीला बसमध्ये डुलकी घेणे चांगलेच भारी पडले आहे.
बसमध्ये प्रवास करताना घेतली डुलकी, चांगलीच पडली भारी!
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिवसाची वेळ असून एक व्यक्ती बसमध्ये बसून आपली अपूर्ण झोप पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती गाढ झोपेत जाते तेव्हा त्याचा एका बाजूला तोल जात असतो आणि अचानक तो खाली पडतो. ती व्यक्ती बसमध्ये खाली पडल्यामुळे बसमध्ये जोरात आवाज होतो, त्यामुळे इतर लोकांचे लक्ष त्याच्याकडे जाते. खाली पडल्यानंतर, व्यक्ती उठते आणि परत आपल्या जागेवर जाते.
— Out of Context Human Race (@NoContextHumans) September 4, 2023
हा काही पहिला अपघात नाही
हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजले असेलच की, प्रवासादरम्यान झोपणे किंवा डुलकी घेणे किती धोकादायक ठरू शकते. यापूर्वी, इंटरनेटवर आणखी एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये बसच्या पुढील सीटवर बसून एक व्यक्ती झोपी गेला होता. बसला थोडासा धक्का लागताच ती व्यक्ती दाराबाहेर आली आणि चालत्या बसमधून खाली पडली. असे अपघात टाळण्यासाठी तुम्ही दररोज 8 तासांची झोप पूर्ण करणे गरजेचे आहे.
मोबाईलचा अतिवापर टाळा
आजकाल लोकांचे जीवन धावपळीचे तसेच इतके व्यस्त झाले आहे की, त्यांना 8 तासही पुरेशी झोप घेता येत नाही. त्यांना झोपायला वेळ मिळाला तरी लोक तो वेळ मोबाईल फोन वापरण्यात घालवतात. आजकाल मोबाईल फोन वापरण्याच्या सवयीमुळे लोकांच्या झोपण्याच्या पद्धतीही काही प्रमाणात बिघडल्या आहेत. कारण मोबाईलच्या दुष्परिणामामुळे अनेकदा थकलेले असूनही लवकर झोप लागत नाही, जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा तुम्हाला अनेकदा चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी झोपेची डुलकी येते, जसे की बस, रिक्षा, मेट्रो किंवा ऑफिस इत्यादी. त्यामुळे आरोग्यासाठी जीवनशैलीत थोडासा बदल करून पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे, जेणेकरून असे अपघात घडणार नाही.