एक्स्प्लोर

Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: केस धरुन...अभिषेक शर्माचा रुद्रावतार; दिग्वेश राठीला भिडला, हात उचलणार तेवढ्यात..., VIDEO

Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: लखनौचा गोलंदाज दिग्वेश राठी आणि हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा सामना सुरु असताना भर मैदानात एकमेकांना भिडले.

Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: आयपीएल 2025 च्या हंगामातील लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या (LSG vs SRH) सामन्यात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाला. लखनौचा गोलंदाज दिग्वेश राठी आणि हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा सामना सुरु असताना (Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight) भर मैदानात एकमेकांना भिडले. यावेळी अंपायरसह लखनौ आणि हैदराबादच्या इतर खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. 

दिग्वेश राठीने (Digvesh Rathi) अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) बाद केल्यानंतर दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं. अभिषेक बाद झाल्यानंतर दिग्वेश सतत काहीतरी बोलत होता. यावेळी अभिषेक शर्माही त्याला नडला. यादरम्यान अभिषेक आणि दिग्वेश एकमेकांवर हात उचलणार की काय?, असं क्रिकेट चाहत्यांना वाटलं. परंतु तेवढ्यात ऋषभ पंत आला आणि त्याने दिग्वेशला मागे खेचले आणि त्याला समजावले. अभिषेक रागाने त्यांच्याकडे हातवारे करत मैदानाबाहेर गेला. दिग्वेश राठीचे केस मोठी आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मा दिग्वेश राठीकडे रागाने बघत आणि केस पकडेल...असे हातवारे करत मैदानाबाहेर गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, सामना संपल्यानंतर, दिग्वेश आणि अभिषेक यांनी हस्तांदोलन केले आणि त्यांच्यात काही संवाद झाला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील अभिषेक आणि दिग्वेशचे दोघांचे बोलणे ऐकताना दिसले.

दिग्वेश राठीवर एका सामन्याची बंदी-

दिग्वेश राठीला एका सामन्यासाठी बंदी घातली जाईल. दिग्वेश आता लखनौ सुपर जायंट्सच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. लखनौचा पुढील सामना 22 मे 2025 रोजी अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स विरुद्ध आहे.

अभिषेक शर्मालाही दंड ठोठावला-

सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मालाही आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात अभिषेकचा कलम 2.6 अंतर्गत हा पहिलाच लेव्हल 1 गुन्हा होता आणि त्यामुळे त्याला एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे. लेव्हल 1 च्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास, मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

सनरायझर्स हैदराबादचा 6 विकेट्सने विजय-

आयपीएल 2025 च्या हंगामात काल लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 6 विकेट्सने विजय मिळवला. या पराभवासह लखनौचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मिशेल मार्श, ऐडन मार्करम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने 20 षटकांत सात बाद 205 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादने 18.2 षटकांत चार बाद 206 धावा करत विजय साकारला. दरम्यान, लखनौ आणि हैदराबादच्या सामन्यात एक जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाले. 

संबंधित बातमी:

Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: अभिषेक शर्मा अन् दिग्वेश राठी भर मैदानात भिडले; थेट बीसीसीआयचे उपाध्यक्ष मध्यस्थीसाठी धावले, काय घडलं?, VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Embed widget