VIDEO: महिलेने भर रस्त्यात लगावले ठुमके; व्हिडीओ पाहून लोकांचा राग अनावर, म्हणाले-...
Viral Video: या महिलेने पारंपरिक ड्रेस घालून भर रस्त्यात ठुमके लगावले आहेत. पण सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून लोक फार चिडले आणि त्यांनी कमेंट्समध्ये महिलेला बरंच सुनावलं.
Viral Video: सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात, जे पाहून अनेकांना राग येतो आणि लोकांचे नाही ते पराक्रम पाहून अनेकांच्या डोक्यात सनक जाते. मग लोक अशा व्हिडीओवर द्वेषपूर्ण कमेंट करतात. आजकाल लोक रील्स आणि व्हिडिओ बनवण्यासाठी काहीही करत आहेत. अगदी मेट्रो, ट्रेन, रेल्वे स्टेशन आणि गजबजलेले रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी नाचतानाचे व्हिडीओ बनवले जात आहेत. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा, ज्यामध्ये ही महिला अगदी गजबजलेल्या रस्त्यावर नाचत आहे.
भर रस्त्यात बेभानपणे नृत्य
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोक इतके वाहून गेले आहेत, की त्यांना कशाचीच पर्वा नाही. ते काय करत आहेत, याचंही भान त्यांना राहत नाही. आता व्हायरल झालेल्या या व्हिडीओतील ही मुलगी पण एकदम पारंपरिक वेशभूषेत (Traditional Dress) दिसत आहे. भर रस्त्यात ती 'आजा वे माही तेरा रास्ता उडीक दिया' या गाण्यावर डान्स करत आहे. मागून पुढून गाड्या ये-जा करत आहे, याचंही या मुलीला भान नाही. हे पाहून सोशल मीडियावरील लोक चांगलेच भडकले आहेत. त्यांनी कमेंट्समधून या मुलीची खरडपट्टीच काढली.
आग लगे बस्ती में, हम हमारी मस्ती में
व्हायरल झालेल्या व्हिडीओतील या मुलीने घागरा घातला आहे. ती अगदी बेभान होऊन गजबजलेल्या रस्त्यावर नाचत आहे. येणारे जाणारे लोकपण तिला वळून-वळून पाहत आहेत, तरी ती तिच्याच धुंदीत कसलीही फिकीर न बाळगता नाचत आहे. एखादी भरधाव वेगात येणारी गाडी तिला उडवेल, याचाही तिला विचार आला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
लोकांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांना महिलेच्या आत्मविश्वासाचं (Confidence) कौतुक केलं आहे. मात्र, तिने भर रस्त्यात डान्स करणं अनेकांना आवडलेलं नाही. एका व्यक्तीने म्हटलं 'हे चुकीचं आहे, 4 लेन हायवेवर असे प्रकार करू नये'. तर दुसऱ्या व्यक्तीने म्हटलं, 'कायदे आणि संस्कार दोन्ही गरीबांसाठी बनवले आहेत. जर श्रीमंतांनी याचं उल्लंघन केलं तर कोणाची त्यांना बोलण्याचीही मजल होत नाही. आणखी एकाने म्हटलं, 'हे तर काहीच नाही. अजून भविष्यात काय-काय पाहायला मिळेल याचा नेम नाही.' दुसर्या एकाने लिहिलं की, 'असेच रील बनवा आणि हायवेवर अपघात घडवा'.
हेही वाचा: