(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: चालत्या ट्रेनमध्येच काकांनी सुरू केला डान्स; शाहरुख खानच्या चल छैय्या छैय्याची येईल आठवण, पाहा व्हिडीओ
Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसतं की, काका अगदी बिनधास्तपणे ट्रेनमधील सर्व प्रवाशांसमोर डान्स करत आहेत.
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा ट्रेनमधील भांडणांचे, शाब्दिक बाचाबाचीचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. तर आता ट्रेनमधला एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचा मूड फ्रेश होईल. तुम्ही जर तणावात असाल, टेन्शनमध्ये असाल तर कदाचित हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचं टेन्शन दूर (Tension free) होईल. आता तुम्ही म्हणाल की या व्हिडीओमध्ये इतकं काय आहे? तर या व्हिडीओमध्ये एक दिलखुलासपणा आहे. डान्स, मस्ती, एंटरटेन्मेंटने भरलेला हा मजेशीर व्हिडीओ आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही.
चालत्या ट्रेनमध्येच थिरकले काका
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक काका एकदम बिनधास्तपणे स्वत:च्या धुंदीत डान्स करत आहेत. 'रात में नींद ना आवे' या हरियाणवी गाण्यावर काकांनी असा जबरदस्त डान्स केला की, ट्रेनमध्ये असलेल्या लोकांना हसू अनावर झालं. संपूर्ण ट्रेनमधील लोक त्यांच्या सीटच्या बाहेर डोकं काढून या काकांचा भन्नाट डान्स डान्स पाहू लागले.
ट्रेनमधील लोकांना हसू अनावर
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काकांसोबत त्या गाण्यावर एक मुलगाही कंबर हलवू लागला. इतक्यात ट्रेनच्या डब्यात बसलेले इतर लोक या दोघांचा व्हिडीओ बनवू लागले. त्या डब्यात एखादाच कुणी असा व्यक्ती असेल, ज्याने या काकांचा डान्स पाहिला नसेल. प्रत्येकजण त्यांच्या डान्स करण्याची स्टाईल पाहून हसू लागला.
लोकांनीही घेतला प्रवासाचा आनंद
ट्रेनमधील सर्व लोकांनी काकांची मज्जा घेतली आणि त्यांचा प्रवास एन्जॉय केला. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ज्याने कोणी हा व्हिडीओ पाहिला, तो शेवटपर्यंत हा व्हिडीओ पाहण्यापासून स्वत:ला थांबवू शकला नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर सुनील नावाच्या व्यक्तीने पोस्ट केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूस मिळाले आहेत.
View this post on Instagram
काकांच्या डान्सवर विविध प्रतिक्रिया
बऱ्याच लोकांनी काकांच्या डान्सवर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं, अहो काका, याआधी तुम्ही कुठे गायब होतात? तर दुसऱ्या व्यक्तीने म्हटलं, आपण सगळ्यांनीही असंच हसत खेळत राहिलं पाहिजे. सर्वांनी आनंदात राहिलं पाहिजे.
हेही वाचा: