Video Viral : अमेरिकेतील 'हे' शहर पुरामुळे उद्ध्वस्त, 5 कुटुंबांची घरे नदीत वाहून गेली, धक्कादायक Video
Video Viral : या घटनेचा व्हिडिओ केसी व्हाईट नावाच्या स्थानिक व्यक्तीने बनवला आहे.
Video Viral : अमेरिकेतील मॉन्टाना राज्याच्या दक्षिणेकडील भागात पुराचा कहर दिसून आला. गार्डिनरमध्ये नदीच्या काठावर असलेले घर पुराच्या तडाख्यात आले. या पुरामध्ये मोठे घर पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीत गेले. या घटनेचा व्हिडिओ केसी व्हाईट नावाच्या स्थानिक व्यक्तीने बनवला आहे. GoFundMe वेबसाईटच्या माहितीनुसार, पाण्याने भरलेल्या घरात पाच कुटुंबे राहत होती. त्याने या घरासह सर्वस्व गमावले. घरात राहणाऱ्या लोकांना आर्थिक फटका बसला आहे. आता त्यांचे घर नाही.
पुरामुळे प्रचंड नुकसान
मॉन्टानाच्या संपूर्ण भागात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मोंटानाच्या नद्या ओसंडून वाहत आहेत. सर्वत्र पाणीच पाणी आहे. नद्यांना उधाण आले आहे. लोक जीवनावश्यक वस्तू घेऊन घर सोडत आहेत. पुरामुळे अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
हवामानाचा इशारा
यलोस्टोन नॅशनल पार्क जवळील भागात दिवसभर भूस्खलन आणि पुराची परिस्थिती कायम होती. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय उद्यान मंगळवार आणि बुधवारी बंद होते. हवामान खात्याने अजूनही हवामानाचा इशारा दिला आहे.
संबंधित इतर बातम्या