Video : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; दोन्ही हातांनी 11 वेगवेगळ्या शैलीत लिहिण्याचा तरूणीचा विश्वविक्रम
Trending News : तुम्ही कधी कोणाला दोन्ही हातांनी लिहिताना पाहिले आहे का? जर नसेल तर, आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीबदद्ल सांगणार आहोत जी वेगवेगळ्या अशा 11 प्रकारे अगदी सहज लिहिते.
Trending News : आपल्या देशात एकापेक्षा एक असे कलाकार आहेत जे आपल्या उत्कृष्ट कलाकृतींद्वारे आपली छाप निर्माण करतायत. असाच एक विक्रम एका मुलीने केला आहे. तुम्ही सहसा दोन्ही हातांनी लिहिताना आतापर्यंत क्वचितच पाहिलं असेल. पण, दोन्ही हातांनी 11 वेगवेगळ्या प्रकारे लिहिताना कोणाला पाहिलं आहे का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीबदद्ल सांगणार आहोत जी वेगवेगळ्या अशा 11 प्रकारे अगदी सहज लिहिते. या मुलीचा लिहिण्यातला स्पीड पाहून सगळेच थक्क झाले आहेत. मंगळुरू येथे राहणारी 17 वर्षीय भारतीय तरुणी 'आदि स्वरूपा' (Aadi Swaroopa) हिने आपल्या कौशल्याने जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दोन्ही हातांनी वेगवेगळ्या प्रकारे लिहिण्याचा रेकॉर्ड
आदि स्वरूपा ही उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांनी एकाच वेळा लिहू शकते. इतकंच नाही तर, आदि स्वरूपा डोळ्यांना पट्टी बांधूनही लिहू शकते. इंग्रजी आणि कन्नड भाषेत एकाच वेळी लिहिताना एका मिनिटात 45 शब्द एकाच दिशेने लिहिण्याच्या क्षमतेसाठी लता फाऊंडेशनच्या विशेष विश्वविक्रमाद्वारे तिला मान्यता मिळाली आहे. एका मिनिटात दोन्ही हातांनी जास्तीत जास्त शब्द लिहिण्याचा विश्वविक्रम या तरुणीने यापूर्वीच केला आहे. या अप्रतिम कौशल्यासाठी आदि स्वरूपाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही आपलं स्थान मिळवलं आहे.
वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी असा विक्रम करून आदि स्वरूपा जगभर प्रसिद्ध झाली. अलीकडेच, हा व्हिडीओ रवी करकरा यांनी शेअर केला आहे. त्याने व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, "ही मुलगी मंगळुरूची 'आदि स्वरूपा' आहे. ती दोन्ही हातांनी 11 वेगवेगळ्या शैलीत लिहू शकते. मेंदूचे दोन्ही भाग एकाच वेळी काम करतात. लाखात एक."अप्रतिम! या कौशल्याला Ambidexterity (द्विसंतुलन) म्हणून ओळखले जाते."
पाहा व्हिडीओ :
She is 'Aadi Swaroopa' from Mangalore. She can WRITE in 11 different style. Both Parts of her BRAIN functions at the Same Time, one in a million. Amazing!
— Ravi Karkara (@ravikarkara) February 5, 2023
This Skill is Known as Ambidexterityhttps://t.co/n3p0LtLksT pic.twitter.com/31g58QrDlb
आदि स्वरूपाच्या या अनोख्या टॅलेंटचं जगभरातून कौतुक होत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :