एक्स्प्लोर

ट्रेन वळवण्याचं काम ऑटोमॅटिक होतं... मग ट्रेनचा ड्रायव्हर म्हणजे लोको पायलट नक्की काम काय करतो?

Train Loco Pilot Work : ट्रेन वळवण्याचं काम ऑटोमॅटिक होतं. ट्रेनचे रुळ ट्रेनच्या मार्गानुसार, ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतात. मग ट्रेनचा ड्रायव्हर म्हणजे लोको पायलट काय काम करतो? जाणून घ्या...

Train Loco Pilot Work : रेल्वे (Train) हा सर्वसामान्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. रेल्वे हा प्रवासाचा सोपा आणि खिशाला परवडणारा मार्ग आहे. भारतात रेल्वेचं मोठं जाळं पसरलेलं आहे. आता रेल्वेची अनेक कामं ऑटोमॅटिक होतात. ट्रेन चालवण्यापासून ट्रेन वळवणं ही सर्व कामं ऑटोमॅटिक होतात. पूर्वी लाईट मॅन ट्रेनच्या प्रवासाच्या मार्गाप्रमाणे रेल्वेचे रुळांची रचना बदलायचे पण आता रेल्वे रुळाप्रमाणे ॲडजस्ट होतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ट्रेनमधील बहुतेक कामं जर तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऑटोमॅटिक होतात, तर मग ट्रेनच्या ड्रायव्हरच म्हणजेच लोको पायलटचं (Loco Pilot) काम काय, तर ते जाणून घ्या.

ट्रेन वळवण्याचं काम ऑटोमॅटिक होतं

ट्रेनच्या ड्रायव्हरला लोको पायलट असं म्हणतात. ट्रेनमधील बहुतेक कामं तंत्रज्ञानाच्या मदतीनं होतात, ट्रेन चालवण्याचं काम पूर्णपणे लोको पायलटचं नसतं. ट्रेन वळवण्याचं कामंही ऑटोमॅटिक होतं. मग इंजिनमध्ये असलेला लोको पायलट नेमकं काय काम करतो. ट्रेन लोको पायलटचं काम काय आहे आणि ड्युटी सुरू झाल्यापासून ते ड्युटी पूर्ण होईपर्यंत त्याला काय करावं लागतं हे सविस्तर वाचा.

लोको पायलटचं काम काय?

लोको पायलटची ड्युटी सुरू झाल्यावर सर्वात आधी इंजिन आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करतो. ट्रेनच्या इंजिनमध्ये कोणतीही अडचण नाही आणि डिझेल किंवा जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेशा प्रमाणात आहेत, याची खात्री लोको पायलट करतो. यानंतर, तो ट्रेनचा मार्ग इत्यादी आणि मॅन्युअलची माहिती घेतो आणि रेल्वे स्टेशन मास्टरची परवानगी घेतल्यानंतर त्याची ट्रेन पुढे रवाना करतो. ट्रेनमध्ये स्टेअरिंग नसल्याने ट्रॅक बदलण्याचं काम आपोआप होतं.

ट्रेनच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचं काम

पण, लोको पायलट नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या दिशानिर्देश, सिग्नल इत्यादींच्या आधारे ट्रेनच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. रेल्वेच्या वेगाबाबत अनेक नियम आहेत, हे नियम लोको पायलटला पाळावे लागतात. रेल्वेचा मार्ग निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण करणे, ही लोको पायलटची जबाबदारी असते. रेल्वेवर ट्रॅकवर येणाऱ्या अडथळ्यांचीही काळजीही लोको पायलटला घ्यावी लागते आणि त्यानुसार ट्रेन चालवावी लागते.

अनेक नियम पाळावे लागतात

लोको पायलटला अनेक अधिकार असतात, पण लोको पायलट मनाला वाटेल तेव्हा किंवा हवी तेव्हा ट्रेन थांबवू शकत नाही. ट्रेन कोणत्या स्टेशनवर थांबवायची हे लोको पायलट स्वतः ठरवू शकत नाही, त्यासाठी त्याला वेळापत्रक आणि स्टेशन मास्टरचे नियम पाळावे लागतात.

दरम्यान, लोको पायलटला ट्रेन थांबवण्याचं किंवा चालवण्याचं अनेक अधिकार असतात. लोको पायलटला ट्रॅकच्या समांतर साईन बोर्डवर केलेल्या सिग्नलनुसार वेग बदलावा लागतो. यासोबतच वेगवेगळ्या दिशानिर्देशांचे पालन करावे लागेल. पाऊस, धुके असताना लोको पायलटचं काम आणि जबाबदारी वाढते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
Embed widget