एक्स्प्लोर

Trending News : 'या' देशात एकही हिंदू नाही, पण राष्ट्रध्वजावर आहे मंदिराचं चित्र; हा देश नेमका कोणता? वाचा रंजक माहिती

Trending News : हे मंदिर 12व्या शतकात महिधरपुराच्या राजांनी बांधले होते. हे एक प्रकारे अनोखं मंदिर आहे.

Trending News : संपूर्णपणे हिंदू राष्ट्र म्हणता येईल असा कोणताही देश जगात नाही. पण, असे अनेक देश आहेत ज्यांच्या राष्ट्रीय प्रतीकांवर तुम्हाला हिंदू देव-दैवतांचे चिन्ह आणि मंदिर यांची चित्र दिसतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे अधिकृतपणे एकही हिंदू राहत नाही, पण तिथल्या राष्ट्रध्वजावर मात्र, एका मंदिराचं सुंदर चित्र आहे. हा देश नेमका कोणता? याचविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.

हा देश कोणता?

आपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत तो कंबोडिया आहे. कंबोडिया हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याच्या ध्वजावर मंदिराचं चित्र आहे. खरंतर, या देशाच्या ध्वजात अनेक बदल करण्यात आले. परंतु त्यावर बांधलेले मंदिर कधीही बदलले नाही. सध्या या देशाचा राष्ट्रध्वज 1989 मध्ये बनवण्यात आला होता. या राष्ट्रध्वजाला 1993 मध्ये कंबोडिया सरकारने मान्यता दिली होती. पण या देशाच्या ध्वजावर मंदिराचं चित्र 1875 मध्येच बनवण्यात आले होते.

हे मंदिर कोणतं आहे?

आपण ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत ते अंगकोर वाटचे मंदिर आहे. हे मंदिर 12व्या शतकात महिधरपुराच्या राजांनी बांधले होते. हे एक प्रकारे अनोखं मंदिर आहे. ते बनवताना ज्या प्रकारची कारागिरी वापरली जाते ती अप्रतिम आहे. तु्म्ही ध्वजावरील झेंड्याकडे नीट पाहिल्यास या मंदिरात पाच मिनार असल्याचे लक्षात येईल. मात्र, ध्वजावर तीनच मिनार दाखवण्यात आले आहेत. या मंदिराची भव्यता इतकी आहे की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने या मंदिराची जगातील सर्वात मोठी धार्मिक वास्तू म्हणूनही नोंद केली आहे. भगवान विष्णूला समर्पित हे मंदिर मूलतः एक हिंदू मंदिर आहे जे राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी बांधले होते. मात्र, नंतर हळूहळू या मंदिराचे बौद्ध मंदिरात रूपांतर झाले आणि नंतर ते हिंदू-बौद्ध मंदिर म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

या देशात कोणत्या धर्माचे लोक राहतात?

कंबोडियातील यूएस दूतावासाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कंबोडियाच्या संस्कृती आणि धर्म मंत्रालयाच्या मते, या देशात 93 टक्के बौद्ध लोक आहेत. तर उर्वरित सात टक्के लोकांमध्ये ख्रिश्चन, मुस्लिम, अॅनिमिस्ट, बहाई, ज्यू आणि काओ दाई धर्म मानणारे लोक आहेत. म्हणजेच अधिकृतपणे पाहिले तर या देशाच्या आकडेवारीत हिंदूंचा उल्लेख नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त वीकेंडचा आनंद घेण्यासाठी सोमवारी कर्मचाऱ्यांची 'Sick Leave'; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Embed widget