(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trending Video : संपत्तीसाठी सुनेची सासूला बेदम मारहाण, घर बनलं कुस्तीचा आखाडा; व्हिडीओ व्हायरल
Viral Video : संपत्तीसाठी सुनेनं सासूला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Daughter-in-Law Attack Bite Mother-in-Law : काही सूना सासू-सासऱ्यांची आई-वडीलांप्रमाणे जीव लावून त्यांची काळजी घेतात. पण, सर्वच सूना अशा नसतात. संपत्ती (Property) आणि लालसेपोटी लोक कोणत्या थराला जातील, काही सांगता येत नाही. संपत्तीसाठी एका सुनेनं सासूला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सून सासूला केस ओढून बेदम मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही तर, ती सासूला चावा घेत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
संपत्तीसाठी सुनेची सासूला बेदम मारहाण
सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, यामध्ये एक सून तिच्या सासूला मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही तर ती दातांनी सासूचा चेहराही चावत आहे. व्हिडीओमध्ये सून सोफ्यावर बसलेल्या सासूला मारहाण करून तिचे केस ओढताना आणि नंतर चावताना दिसत आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सासूला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये मागे सोफ्यावर एक लहान मुलगी देखील दिसत आहे. ती मुलगी साधारण सात ते आठ वर्षांची असल्याचं दिसून येत आहे. डोळ्यांसमोर ही घटना पाहून ती मुलगीही अस्वस्थ झालेली दिसते. मारहाण झाल्यानंतर भीतीने ती तिथून पळ काढते. व्हायरल व्हिडीओच्या शेवटी, वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर दातांच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत, ज्यावरून त्यांवरील हल्ला किती धोकादायक होता हे कळतंय.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
Daughter-In-Law beats up and bites old mother-in-law in a fight over property. Take action against her @CP_SuratCity pic.twitter.com/8zr8RhDkUA
— Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) June 25, 2023
घर बनलं कुस्तीचा आखाडा
हा व्हिडीओ दीपिका भारद्वाज (@DeepikaBhardwaj) या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 'सून मालमत्तेच्या वादातून वृद्ध सासूला मारहाण केली आणि चावली. तिच्या @CP_SuratCity विरुद्ध कारवाई करा.' असं कॅप्शन देत त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
काय आहे प्रकरण?
पत्रकार आणि डॉक्युमेंट्री फिल्ममेकर दीपिका नारायण भारद्वाज यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण संपत्तीच्या वादातून मारहाण झाल्याचं म्हटलं आहे. ट्विटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. हे प्रकरण गुजरातमधील सुरतमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित इतर व्हिडीओ :