Samosa : समोसा भारतीय नाही तर परदेशी, तो देशात आला कुठून; वाचा रंजक माहिती
Samosa History: अनेक वर्षापूर्वी समोसा मध्यपूर्वेतून भारतात आल्याचं म्हटलं जातं. इराणी व्यापाऱ्यांमुळे पहिल्यांदा समोसा भारतात आला.
Samosa: आपल्या देशात बहुतेक लोकांना सकाळी नाष्ट्यात चहासोबत गरमगरम समोसे (samosa) लागतात. देशात कोणतेही शहर, गाव-खेडे किंवा गल्ली असो समोसा सहज उपलब्ध होतो. कारण कमी वेळेत आणि चटपटीत समोसा खाण्यासाठी सहज उपलब्ध होतो. त्यामुळे सगळीकडे अगदी सहज विकला जातो. आपला देशात विविधतेने नटलेला आहे असून खाद्य संस्कृतीतही वैविध्य पाहायला मिळतं. त्यामुळे समोश्याची डिशमध्ये वैविध्य दिसतं. साधारपणे आपण खात असलेला किंवा माहिती असणारा समोसा हा मैदा, बटाटा, चटणी किंवा चीज टाकून तयार केला जातो. मुंबईकारांच्या सकाळच्या नाष्ट्यात तर समोसा अत्यंत आवडीने खाल्ला जातो. इतक्या चवीने खाल्ला जाणारा समोसा भारतीयांना आपलीच डिश वाटते. पण हे काही खरे नाही. कारण समोसा डिश भारतीय नसून विदेशी खाद्यपदार्थ आहे.
भारतात समोसा खूप लोकप्रिय आहे. यामुळे देशात हजारो कोटींचा व्यवसाय होत असतो. एका माहितीनुसार, आज देशात दररोज 7 ते 8 कोटी समोसे फस्त होत असल्याचं समोर आलं आहे. यावरूनच समोशाची उलाढाल किती मोठी आहे ते दिसून येतं. साधारणपणे एक समोसा 12 ते 20 रूपयांपर्यंत मिळतो. मुंबईतही समोसा मोठ्या प्रमाणात विकला जातो. देशात तर खूप मोठी बाजारपेठ असल्याचं दिसतं. त्यामुळे आज भारतीय समोशाला विदेशातही प्रचंड मागणी आहे. काही वर्षापूर्वी एक समोसा 7 ते 8 रूपयांपर्यंत मिळायाचा आजघडीला समोसा 12 ते 20 रूपयांपर्यंत मिळतो. अर्थात, ही किंमत समोशाच्या साईजनुसार बदलत असते.
समोसा भारतात कसा आला?
भारतीय लोक समोशाला इतक्या आवडीने खात असतात. पण या समोश्याचा इतिहासही रंजक आहे. अनेक वर्षापूर्वी मध्यपूर्वेतून भारतात आल्याचं म्हटलं जातं. इराणवरून आलेल्या व्यापाऱ्यांमुळे पहिल्यांदा समोसा भारतात आल्याचं म्हटलं जातं. समोशाला फारसी भाषेत 'संबुश्क' या नावानं ओळखलं जातं. भारतात बहुतेक ठिकाणी समोसा नावानंचं ओळखलं जातं. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये समोश्याला सिंघाडा (singhara)या नावानं लोक ओळखतात. याचं कारण समोसा ही दिसायला सिंघाड्यासारखा असल्याचं सांगितलं जातं. यामुळे समोशाचा हा प्रवास खूप रंजक आहे. आज समोसा त्रिकोणी, चौकोणी आकरात पाहायला मिळतो. परदेशातून भारतात आलेल्या समोश्याचं भारतीयकरण झालंय.
दहाव्या ते अकराव्या शतकात समोशाचा उल्लेख
आपण सर्व भारतीय जो समोसा आवडीने खातो तो खूप वर्षापासून खाल्ला जात होता. इतिहासकार अबुल-बेहाकी यांच्या एका लेखात समोश्याचा सर्वात पहिल्यांदा अकराव्या शतकात उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी मोहम्मद गझनीच्या दरबारात ख्खिमा आणि मावा भरलेला चवीला एक चटपटीत असणाऱ्या पदार्थाचा उल्लेख केला आहे. पण समोश्याचा नेमका आकार कधी बदलला, त्रिकोणी आकाराचा समोसा कधीपासून बनायला सुरूवात झाली याची निश्चित माहिती मिळत नाही.
समोश्यात झालेला बदल
मध्यपूर्वेतून समोसा भारतात आल्याचं म्हटलं जातं. याचा अर्थ समोसा हे परदेशी पदार्थ आहे. इराण, अफगाणिस्तान येथून प्रवास करत समोसा येथे आला. या प्रवासात समोश्याचा आकारापासून तर त्याच्या भरण्यात आलेल्या स्टफिंगमध्ये अनेक बदल झाल्याचं म्हटलं जातं. कारण मध्येपूर्वेतील काही देशात समोशात ड्रायफ्रूड्स तर काही देशात मिक्स फळांऐवजी मटणाने जागा घेतली आहे.