Haunted Island : 'या' ठिकाणी लाखो लोकांना जिवंत जाळलं, पावला-पावलावर सापडतात मानवाच्या अस्थी, काय आहे याचं गूढ?
Poveglia Island : 1960 मध्ये एका श्रीमंत व्यक्तीने हे बेट विकत घेतलं होतं, पण त्याच्या कुटुंबाचा अपघात झाला आणि त्यानेही आत्महत्या केली. तेव्हापासून हे बेट शापित मानलं जातं.
One Lakh People Burnt Alive : पृथ्वीवर (Earth) अनेक रहस्यमय ठिकाणं (Mysterious Places) आहेत. काही जागा शापित मानल्या जातात. अनेक ठिकाणं अशी आहेत, जिथे गेलेला मनुष्य पुन्हा जिवंत येत नाही, असंही सांगितलं जातं. आम्ही आज तुम्हाला अशाच एका जागेबद्दलची माहिती देणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक पावलावर माणसाची हाडं दिसतील, असं सांगितलं जातं. ही जागा इतकी धोकादायक मानली जाते की, सरकारही इथे न जाण्याचा सल्ला देते. या ठिकाणी 1 लाख 60 हजार जणांना जिवंत जाळण्यात आल्याचं सांगितलं जातं.
'आयलँड ऑफ डेड'
एक बेट अतिशय शापित ठिकाण मानलं जातं. हे बेट 'आयलँड ऑफ डेड' म्हणून ओळखलं जातं. इथे जाणाऱ्या लोकांना जिवंत परतणं अशक्य असल्याचं सांगितलं जातं. या बेटाशी संबंधित एक भयावह कथा प्रचलित आहे. यामुळे लोक इथे जाण्याची इच्छा आणि हिंमतही करत नाहीत आणि चुकून कुणी गेला तर त्याचं जिवंत परतणं कठीण मानलं जातं या बेटावर शेकडो वर्षांपूर्वी प्लेगच्या दीड लाख रुग्णांना जिवंत जाळण्यात आले होतं. रुग्णांना मरणासाठी सोडलं होते. त्यामुळेच हे बेट शापित मानलं जातं.
सरकारकडून येथे जाण्यावर बंदी घातली
जगभरात काही लोक विविध झपाटलेल्या ठिकाणांची चाचणी घेण्यासाठी जातात. त्याप्रमाणे या बेटावर जाण्याचं धाडस कोणी करू शकत नाही. इटलीतील हे पोवेग्लिया हे बेट शापित असल्याचं मानलं जातं. असं म्हटलं जातं की, या बेटावर मृत्यूचा वास आहे आणि जो व्यक्ती येथे जातो तो जिवंत परत येत नाही. या बेटावर गेलेले काही लोक परत येऊ शकले नाहीत किंवा जे परत आले त्यांनी हे बेट शापित असल्याचं सांगितलं. येथून परतलेल्या लोकांनी सांगितलं की, इथे विचित्र आवाज ऐकू येतात. इटालियन सरकारही इथे जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची हमी देत नाही.
बेटावर मानवी अवशेषांचा खच
इटलीतील व्हेनिस आणि लिडो शहराच्या दरम्यान असलेल्या या बेटाला 'व्हेनेशियन गल्फ' असंही म्हणतात. हे बेट सुमारे 17 एकर क्षेत्रात पसरलं आहे. या बेटावरील अर्धी जमीन मानवी अवशेषांनी बनलेली असल्याचं म्हटलं जातं. इटलीमध्ये प्लेगच्या प्रादुर्भाव झाला त्यावेळी सरकारने 1 लाख 60 हजार संक्रमित लोकांना या बेटावर आणलं आणि महामारी थांबवण्यासाठी त्यांना जिवंत जाळलं. याशिवाय ब्लॅक फिव्हर आजारानं मरण पावलेल्या लोकांनाही या बेटावर दफन करण्यात आलं.
बेटावरून येतात विचित्र आवाज
या बेटावर 1922 मध्ये मानसिक रुग्णालय बांधले गेलं पण, तेही लवकरच बंद पडलं. असं सांगितलं जातं की, रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना येथे अनेक असामान्य गोष्टी दिसू लागल्या. डॉक्टर आणि परिचारिकांनी येथे विचित्र हालचाली घडत असल्याचं सांगितलं. त्यानंतर हे रुग्णालय बंद बडलं.
1960 मध्ये एका व्यक्तीने बेट विकत घेतलं, पण...
यानंतर 1960 मध्ये एका श्रीमंत व्यक्तीने हे बेट विकत घेतलं, पण त्याच्या कुटुंबाचाही काही कारणास्तव अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यानंही आत्महत्या केली. तेव्हापासून हे बेट शापित मानलं जातं.