Ayesha Death News :'मेरा दिल ये पुकारे'फेम पाकिस्तानी तरूणीचा मृत्यू? नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर
Ayesha Death News : सोशल मीडियावर आयेशा मानोच्या मृत्यूबद्दल बातम्या पसरत आहेत.
Ayesha Death News : काही काळापूर्वी एका पाकिस्तानी तरूणीचा व्हिडीओ भारतात व्हायरल झाला होता. आयेशा मानो (Ayesha Mano) असं या तरूणीचं नाव असून तिचा एका लग्नातील 'मेरा दिल ये पुकारे' या गाण्यावरचा डान्स सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता सोशल मीडियावर आयेशा मानोच्या मृत्यूबद्दल अनेक बातम्या पसरत आहेत. यामधून असं सांगितलं जातं की, ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे तिचा मृत्यू झाला आहे. खरंतर हे प्रकरण नेमकं काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सध्या सगळीकडे व्हायरल होत चाललेल्या बातम्यांमध्ये आयेशा मृत्यू झाला इतकंच सत्य आहे. पण ती आयेशा व्हायरल पाकिस्तानी तरूणी आयेशा मानो नसून आयेशा हनिफ असं मृत तरूणीचं नाव आहे. या दोघीही टिकटॉकर असल्या कारणाने आयेशा मानोच्या मृत्यूसंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याशिवाय लोक आयेशा मानोचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिला श्रद्धांजली देखील वाहतायत.
एकीकडे आयेशाच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत तर दुसरीकडे आयेशा मानो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ऑनलाईन कमाईची कल्पना देत आहे. आयेशाने मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता तिच्या अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. काही तासांतच आयेशाच्या व्हिडीओला सुमारे सात हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. मात्र, यामध्ये आयेशाचं कमेंट सेक्शन हाईट ठेवण्यात आलं आहे.
कोण आहे आयेशा हनिफ आणि तिचा मृत्यू कसा झाला
पाकिस्तानी न्यूज वेबसाईट एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, आयेशा हनिफ ही देखील एक टिकटॉकर आहे. शनिवारी सकाळी जिना मेडिकल सेंटरमध्ये एका महिला टिकटॉकरचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी आयेशा हनिफचा पती मोहम्मद आदिल आणि सासू नुसरत सोबिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
आयेशा एका प्रायव्हेट पार्टीला गेली होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयेशा हनिफ डीएचए फेज 1 मधील एका घरात एका खाजगी पार्टीत गेली होती. त्या घराचा मालक अद्याप समोर आलेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी आयेशाची सासू नुसरत सोबिया यांची चौकशी केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या गेल्या 16 वर्षांपासून कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर भागात भाड्याने राहत आहेत. पण काही दिवस गुजरातमध्ये होत्या आणि जेव्हा त्यांना आपल्या सुनेच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा त्या लगेच कराचीला आल्या.
महत्त्वाच्या बातम्या :
करायला गेली एक पण झालं भलतंच... सुंदर दिसण्यासाठी लाखो रुपये खर्च, आता मिळत नाहीय बॉयफ्रेंड