करायला गेली एक पण झालं भलतंच... सुंदर दिसण्यासाठी लाखो रुपये खर्च, आता मिळत नाहीय बॉयफ्रेंड
Viral Social Media Influencer : अँड्रिया इवानोव्हा (Andrea Ivanvoa) एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती तिच्या ओठांच्या आकारांमुळे जगभरात चर्चेत आहे.
Trending News : सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. काही जण यासाठी घरगुती उपाय करतात. तर, काही जण महागडे प्रोडक्ट्स वापरतात. यानंतरही काहींची इच्छा पूर्ण होत नाह. मग ज्यांना परवडतं ते लोक शस्त्रक्रिया करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. काही जण प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) करुन स्वत:ला हव्या त्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतात. यानंतर काहींची इच्छा पूर्ण होते पण, काहींची शस्त्रक्रिया फेल ठरते आणि सुंदर दिसण्याच्या नादात काही भलतंच होऊन बसतं.
करायला गेली एक पण झालं भलतंच...
आम्ही तुम्हाला अशा एका तरुणीबद्दल सांगणार आहोत. या तरुणीने सुंदर दिसण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. पण, आता ती बॉयफ्रेंडच्या शोधात आहे. या तरुणीने सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करुन ओठांचा आकार वाढवला. ही 25 वर्षीय तरुणी एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून सध्या बॉयफ्रेंडच्या शोधात आहे.
लाखो रुपये खर्च करून वाढवला ओठांचा आकार
अँड्रिया इव्हानोव्हा व्यवसायाने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती 25 वर्षांची असून बल्गेरिया (Bulgaria) देशात राहते. पण ती तिच्या ओठांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. मोठे ओठ मिळविण्यासाठी तिने लाखो रुपये खर्च केले आहेत. आणि आता ती स्वत:साठी बॉयफ्रेंड शोधत आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अँड्रिया इव्हानोव्हा ही जगातील सर्वात मोठे ओठ असलेली महिला आहे. तिच्या ओठांचा आकार पाहूनच तुम्हाला अंदाज येईल की, आम्ही असं का म्हणतोय.
अँड्रिया शोधतेय बॉयफ्रेंड
लाखो रुपये खर्च करून हा लूक मिळवल्यानंतर आता अँड्रिया स्वत:साठी बॉयफ्रेंड शोधत आहे, मात्र या लूकमुळे कोणताही मुलगा तिला पसंत करत नाहीये. कसा बॉयफ्रेंड हवा याबद्दल सांगताना अँड्रियाने सांगितलं की, जो तरुण तिला आणि तिच्या ओठांचा स्वीकार करेल, असा मुलगा तिल हवा आहे. तिने पुढे सांगितलं की, जर तिच्या जोडीदाराला तिच्यासोबत रस्त्यावर चालताना लाज वाटत असेल तर ती त्याच्याशी संबंध तोडेल आणि नवीन जोडीदार शोधेल.
'हे' आरोग्यासाठी घातक ठरू शकतं
अँड्रिया तत्त्वज्ञानाची (Philosophy) विद्यार्थिनी आहे. अचानक अँड्रियाला आपले ओठ मोठे असावे अशी इच्छा झाली. ही सत्यात उतरवण्यासाठी तिने लाखो रुपये खर्च करून लिप फिलर करुन घेतलं. यामुळे ओठांच्या आकार खूपच वाढला आहे. तरीही तिनं मन अजून भरलेलं नाही. तिची अजूनही मोठे ओठ करण्याची इच्छा आहे पण डॉक्टर याच्या विरोधात आहे. कारण, असं करण तिच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. डॉक्टरांनी सांगितलं आहे की, नकार देऊनही तिने आणखी ओठांमध्ये आणखी फिलर्स टाकणं सुरूच ठेवलं तर काही रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात, ज्यामुळे तिचा मृत्यू होऊ शकतो.
इतर संबंधित बातम्या :