Politics: 'या' शहरात चुकूनही रात्र घालवत नाहीत मंत्री आणि मुख्यमंत्री; सत्ता गमावण्याची असते भीती
General Knowledge: भारतात अशी अनेक ठिकाणं आणि निवासस्थानं आहेत, जिथे मुख्यमंत्री आणि मंत्री राहायला घाबरतात. त्यातीलच एक शहर आहे, जिथे रात्री मुक्काम करण्याची हिंमत कोणताही मंत्री करत नाही.
Politics: राजकारणातील अनेक गोष्टी तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतील, ज्यात मोठमोठे नेते एखाद्या अंधश्रद्धेला (Superstition) फॉलो करताना दिसतात. राजकारणी (Politician) माणसांना सत्ता गमावण्याची भीती जास्त असते, त्यामुळे ते प्रत्येक पाऊल टाकताना दहा वेळा विचार करतात. एखादं वक्तव्य करताना, एखादी क्रिया करताना किंवा भाषणादरम्यान देखील. अशाच प्रकारे राजकारणी नेते सत्तेशी संबंधित अनेक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात, यातील एका प्रकाराबद्दल आज जाणून घेऊया.
भारतात अशी काही ठिकाणं आहेत, जिथे नेत्यांनी, मंत्र्यांनी रात्र घालवल्यास ते आपली सत्ता गमावू शकतात असा समज आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाण्यास नेते घाबरतात, तिथे गेले तरी ते रात्रीचा मुक्काम करत नाहीत. मध्य प्रदेशातही अशीच एक जागा आहे, जिथे कोणताही मुख्यमंत्री किंवा मंत्री रात्र घालवायला बघत नाही, मंत्री तिथे रात्रीचा मुक्काम करायला घाबरतात. कारण असं मानलं जातं की, जो कोणीही मंत्री त्या शहरात रात्रीचा मुक्काम करेल तो सत्तेत परत येऊ शकत नाही. हे मानण्यामागे देखील एक विशिष्ट कारण आहे.
नेमकं मंत्री का थांबत नाहीत या शहरात?
अनेक मंत्री आणि मुख्यमंत्री महाकालची नगरी म्हटल्या जाणाऱ्या उज्जैनला भेट देत आहेत, पण त्यांना तिथे राहण्याची हिंमत होत नाही. भगवान महाकाल हे याचं कारण मानलं जातं. अशी मान्यचा आहे की, महाकाल हा आजही उज्जैनचा राजा आहे आणि त्यामुळे इतर कोणत्याही राजाने तिथे राहणं योग्य नाही. असं केल्यास त्याला शिक्षा भोगावी लागू शकते. पौराणिक कथांमधून उदाहरणं देतानाही हे सांगण्यात आलं आहे.
आता या गोष्टीकडे एखादा नेता कसा दुर्लक्ष करू शकतो? आणि त्यामुळेच बडे नेते भगवान महाकाल यांच्यापुढे नतमस्तक झाले तरी त्यांच्या महाकाल नगरीत, म्हणजेच उज्जैनमध्ये राहणं टाळतात. सत्तेत एखाद्या मंत्र्याचा पाय कितीही मजबूत असला तरी मंत्री आणि मुख्यमंत्री हा धोका पत्करायला घाबरतात.
असा विश्वास फक्त उज्जैनबद्दल आहे असं नाही, तर विविध राज्यांमध्ये अशी अनेक निवासस्थानं आणि ठिकाणं आहेत जिथे मुख्यमंत्री किंवा मंत्री राहत नाहीत. काही लोक वास्तुदोषांमुळे असं करणं टाळतात, तर काहींना पौराणिक कथांनंतर शक्ती गमावण्याची भीती वाटते, त्यामुळे ते असा गोष्टी करत नाहीत.
हेही वाचा:
Facts: जगात आहे एक असं गाणं, जे गाताच माणूस मरतो; यामागची कहाणी नेमकी काय?