ट्विटरवर 'मेलोडी' हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये; इटलीच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल; मोदींचाही कडक रिप्लाय'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गतवर्षीही G7 देशांच्या बैठकीसाठी इटलीला गेले होते. त्यावेळी त्यांनी युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली होती
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिलाच विदेश दौरा इटलीचा केला आहे. जी7 (G7Summit) परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत पोहोचले, तिथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी नमस्ते करत मोदींचे स्वागत केले. येथील जी 7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर मोदी आज मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत एक उच्चस्तरिय समिती होती. त्यामध्ये नवनियुक्त परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रआ आणि एनएसए अजित डोवाल यांचा समावेश होता. या परिषदेत अनेक महत्त्वाच्य आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा झाली. मात्र, मोदींचा हा दौरा सोशल मीडियावर चर्चेत आहे, तो इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी व मोदींच्या भेटीमुळे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गतवर्षीही G7 देशांच्या बैठकीसाठी इटलीला गेले होते. त्यावेळी त्यांनी युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर, लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनले आहेत. त्यामुळे, यंदाच्या जी 7 परिषदेतही ते पोहोचले होते. येथे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन, युक्रेनचे राष्ट्रपती व्ल्हादोमिर झेलेस्की यांची भेट घेतली. तर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. दरम्यान, जॉर्जिया यांनी मोदींसमवेत सेल्फी घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर, जॉर्जिया यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, मोदी +मेलोनी.. म्हणजे #मेलोडी हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. तर, व्हिडिओतही जॉर्जिया यांनी हॅलो... फ्रॉम द मेलोडी टीम.. असे जॉर्जिया यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हा व्हिडिओ रिशेअर केला आहे.
Long live India-Italy friendship! 🇮🇳 🇮🇹 https://t.co/vtOv8lfO51
— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2024
नरेंद्र मोदींचाही रिप्लाय
"Long live India-Italy friendship असा रिप्लाय मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या ट्विटला दिला आहे. दोनी उभय देशांचे मैत्रीपूर्ण संबंध दिर्घीकाळ राहतील, असे मोदींनी म्हटले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हॅशटॅग मेलोडी नावासह हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तर, मेलोनी यांनी मोदींसमवेत घेतलेला सेल्फीही चर्चेत आणि ट्रेंडिंगमध्ये असल्याचे दिसून येते. दरम्यान, भारताला जी7 परिषदेत निमंत्रित केल्याबद्दल आणि परिषदेत शानदार नियोजन व व्यवस्था केल्याबद्दल आभार, असेही मोदींनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
G7 परिषदेत कोण-कोणते देश
दरम्यान, G7 देशांच्या समितीत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली,जर्मनी, कॅनडा आणि जपान या विकसित देशांचा समावेश होता. इटली हा यंदाच्या बैठकीचा यजमान देश आहे. G7 देशांच्या बैठकीत जगभरातील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली जाते. हा गट आधी G8 असा होता. पण, 2014 साली रशियाने क्रिमियावर हल्ला केल्यानंतर त्या देशाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. त्यामुळे, यंदाच्या जी 7 परिषदेत रशियाचे प्रमुख उपस्थित नव्हते.