![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Marathi Jokes : अहो थोडं हसा की... एका माणसाने पिंटूला विचारलं; तुझ्या पप्पांचं नाव काय? पिंटू म्हणतो...
Marathi Jokes : या धावपळीच्या युगात अनेकांना बहुधा तणावाचा सामना करावा लागतो. यातून थोडा वेळ काढून चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम हे भन्नाट जोक्स करतात.
![Marathi Jokes : अहो थोडं हसा की... एका माणसाने पिंटूला विचारलं; तुझ्या पप्पांचं नाव काय? पिंटू म्हणतो... Marathi Jokes latest funny marathi joke of the day santa banta marathi jokes husband and wife jokes Marathi Jokes : अहो थोडं हसा की... एका माणसाने पिंटूला विचारलं; तुझ्या पप्पांचं नाव काय? पिंटू म्हणतो...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/07/81f3694b7066b6b2c2f42543ac091e181723000006240713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi Joke : चिंता ही अशी बाब आहे, जी जिवंतपणीच मानवाला जाळत राहते, त्यामुळे चिंता करत बसण्यापेक्षा आपलं आणि दुसऱ्यांचं जीवन विनोदांच्या माधमातून आनंदमयी आणि हास्यमयी बनवलं पाहिजे. त्यासाठीच हा छोटा प्रयत्न.
मराठी जोक्स (Marathi Jokes)
नवरा बायकोचं भांडण चालू असतं…
नवरा: तू स्व:तला आवर...
नाहीतर माझ्यातलं जनावर बाहेर येईल…
बायको: हा हा येऊ दे.... उंदराला कोण घाबरतंय
शिक्षक: पक्ष्यांची दृष्टी चांगली असते की माणसांची?
बंता: पक्ष्यांची...
शिक्षक: ते कसे?
बंता: कारण मी त्याला कधीच चष्मा घातलेला पाहिला नाही.
एका माणसाने पिंटूला विचारले- बेटा, तुझ्या वडिलांचे नाव काय?
पिंटू - काका, मी अजून त्यांचे नाव ठेवले नाही, मी त्यांना लाडाने फक्त पप्पा म्हणतो.
संता – यार, तुमची मिठाईचं दुकान आहे,
तुला पण यातलं काहीतरी खावं वाटत असेल ना…!
बंता – हा ना, यार…
पण वडील रसगुल्ले मोजून जातात…
म्हणून मी फक्त चोखून ते परत ठेवून देतो…!
संता समोसा उघडून त्यातील फक्त मसालाच खात असतो…
बंता – अरे…! तू असं का करतोय…?
संता – अरे मी आजारी आहे,
त्यामुळे डॉक्टरने मला बाहेरचं खाण्याची मनाई केली आहे…!
संताची गर्लफ्रेंड संताला – इतकी जोरात गाडी नको पळवू…
मला भिती वाटतेय..
संता – अरे जर तुलाही भिती वाटत असेल,
तर माझ्यासारखे डोळे बंद करून घे…!
डॉक्टर – बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात
आणि सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत…
काही कळतच नाहीये,
यांना नेमकं काय झालंय ते…?
बाई (काळजीच्या सुरात) – अहो डॉक्टर साहेब, ते
पोस्ट मार्टम का काय असतं, ते तरी करून पहा एकदा…!
(पेशंट फरार आहे…)
हेही वाचा:
Shani Dev : येणारा काळ 'या' राशींसाठी आव्हानात्मक; शनी-राहू आणि सूर्याच्या युतीमुळे बनणार भयानक योग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)