Shani Dev : येणारा काळ 'या' राशींसाठी आव्हानात्मक; शनी-राहू आणि सूर्याच्या युतीमुळे बनणार भयानक योग
Shani Dev : सूर्य आणि शनी ग्रहात शत्रुत्व असल्यामुळे याचे अशुभ परिणाम मिळणार आहेत. त्याचबरोबर, सूर्य राहुच्या एकत्र येण्याने देखील अशुभ परिणाम मिळणार आहेत.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या चालीत बदल आणि राशी परिवर्तनाने जुळून येणाऱ्या ग्रहांच्या युतीमुळे अनेक प्रकारे शुभ आणि अशुभ परिणाम घडून येतात. तसेच, या काळात अनेक योगही निर्माण होतात. असाच एक योग ऑगस्ट महिन्यात जुळून येणार आहे. ऑगस्ट महिन्यात सूर्य, शनी (Shani Dev) आणि राहुच्या स्थितीत बदल झाल्यामुळे भयानक योग निर्माण होणार आहे. या महिन्यात राहू, शनी (Lord Shani) आणि आणि सूर्यामुळे कोणता भयानक योग निर्माण होणार आहे आणि याचा कोणकोणत्या राशींवर (Zodiac Signs) परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
शनी, राहू आणि सूर्याच्या युतीमुळे जुळून आला भयानक योग
ऑगस्ट महिन्यात भूमिपुत्र मंगळ, बुद्धी आणि वाणीचा कारक ग्रह बुध, सुख-शांती वैभवचा कारक ग्रह शुक्र राशी परिवर्तन करणार आहेत. शनीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, शनी सध्या आपली मूळ रास कुंभ राशीत विराजमान आहे. याच महिन्यात सूर्याच्या राशीपरिवर्तनाने सूर्य आणि शनी दोन्ही मिळून समसप्तक योगाची निर्मिती करणार आहेत. सूर्य आणि शनी ग्रहात शत्रुत्व असल्यामुळे याचे अशुभ परिणाम मिळणार आहेत. त्याचबरोबर, सूर्य राहुच्या एकत्र येण्याने देखील अशुभ परिणाम मिळणार आहेत.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य-शनी आणि राहुमुळे जुळून आलेला योग फार भयानक असणार आहे. मेष राशीच्या लोकांवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. यामुळे या काळात कोणतंही कठीण किंवा जबाबदारीचं काम करु नका. नोकरदार वर्गातील लोकांनी या काळात सांभाळून राहण्याची गरज आहे. तसेच, धन-संपत्तीच्या बाबतीत तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. नवीन योजना आखत असाल तर त्यासाठी हा शुभ काळ नाही.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी येणारा काळ कठीण असणार आहे. तुम्हाला कोणतंही काम करताना फार सतर्क राहावं लागेल. तसेच, आरोग्याशी संबंधित तुम्हाला काही संकटांना सामोरं जावं लागेल. एखाद्या गंभीर आजाराने तुम्ही त्रस्त असू शकता. या काळात पैशांचा देखील जपून वापर करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते. तसेच, या दरम्यान, कोणालाही पैसे देताना सांभाळून आणि नीट विचारपूर्वक निर्णय घ्या. दिग्गजांचा सल्ला घ्या.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना फार अशुभ असणार आहे. या दरम्यान, तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. सूर्य, शनी आणि राहुमुळे जुळून आलेला भयानक योग तुमच्यासाठी शुभ नसणार आहे. या दरम्यान तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला अपयश येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :