धक्कादायक! हजारो लोक पाहत होते लाईव्ह सामना, अचानक स्टेडिअमची गॅलरी कोसळली, 200 जखमी
Kerala Football Match Audience Gallery : फुटबॉल सामना पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडिअममध्ये पोहचले होते. लाईव्ह सामना सुरु असतानाच अचानक स्टेडिअमची गॅलरी कोसळली.
Kerala Football Match Audience Gallery : फुटबॉल सामना पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडिअममध्ये पोहचले होते. लाईव्ह सामना सुरु असतानाच अचानक स्टेडिअमची गॅलरी कोसळली. या दुर्घटनेत 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात एका फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आलेली स्टेडिअमची गॅलरी अचानक कोसळली. शनिवारी मलप्पुरम येथे फुटबॉल सामना सुरु होण्याआधी ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये 200 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, ‘शनिवारी एका फुटलबॉल सामन्यापूर्वी स्टेडिअमची गॅलरी अचानक कोसळली. त्यामुळे 200 जण जखमी झाले आहेत. यामधील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मलप्पुरम येथील पूनगोड स्टेडियममध्ये ही घटना घडली. ‘
पाहा व्हिडीओ.....
#WATCH Temporary gallery collapsed during a football match in Poongod at Malappuram yesterday; Police say around 200 people suffered injuries including five with serious injuries#Kerala pic.twitter.com/MPlTMPFqxV
— ANI (@ANI) March 20, 2022
मिळालेल्या वृत्तानुसार, केरळमधील मलप्पुरममधील पूनगोड स्टेडियममध्ये शनिवारी फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सामन्याला हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली होती. लाईव्ह सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली होती. त्याचवेळी अचानक प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आलेली गॅलरीच कोसळली. यामध्ये 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर आधी एकच गदारोळ माजला होता. लोक सैरावैरा धावत होते. काही वेळानंतर गॅलरीखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी सर्वच धावले. त्यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा -
- Corona Virus : कोरोनाचा पुन्हा धुमाकूळ! जगभरात चौथ्या लाटेचा उद्रेक
- Corona : एक कोरोना पेशंट सापडला तर 'या' देशात लॉकडाऊन, बॉर्डरही केल्या सील...!
- Mumbai Local Train : मुंबईत लोकल प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस अनिवार्य
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live