Kerala : केरळच्या डॉक्टरांचं होतंय कौतुक! सुवाच्य अक्षरांनी लिहलेले प्रिस्क्रिप्शन व्हायरल, रुग्णही स्पष्टपणे वाचू शकतील
Kerala Doctor Prescriptions : सोशल मीडियावर डॉक्टरांचे अतिशय सुबक हस्ताक्षराचे चित्र व्हायरल होत आहे. जे कोणत्याही रुग्णाला वाचता येईल.
![Kerala : केरळच्या डॉक्टरांचं होतंय कौतुक! सुवाच्य अक्षरांनी लिहलेले प्रिस्क्रिप्शन व्हायरल, रुग्णही स्पष्टपणे वाचू शकतील Kerala doctor Prescriptions written in super clear letters can be clearly read by patients marathi news Kerala : केरळच्या डॉक्टरांचं होतंय कौतुक! सुवाच्य अक्षरांनी लिहलेले प्रिस्क्रिप्शन व्हायरल, रुग्णही स्पष्टपणे वाचू शकतील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/30/6b7e1d0b2ed8d68d8ecb7cd8ebbcb58a1664500590621381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kerala Doctor Prescriptions : डॉक्टर (Doctor) त्यांच्या प्रिस्क्रीप्शनवर त्यांच्या हस्ताक्षरात जे काही लिहतात. ते खरं तर कोणत्याच रुग्णाला समजत नाही. जे फक्त फार्मासिस्टच समजू शकतात. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स ऑनलाइन पोस्ट करण्यात आले आहेत. पण अलिकडच्या काळात सोशल मीडियावर अतिशय सुबक हस्ताक्षराचे चित्र व्हायरल होत आहे. हे अक्षर केरळचे (Kerala) डॉ. नितीन नारायणन यांचे आहे आणि ते कोणत्याही रुग्णाला वाचता येईल. हे डॉक्टर केरळच्या पलक्कड येथील कम्युनिटी हेल्थ सेंटर (CHC) येथे बालरोगतज्ञ म्हणून काम करतात, बेन्सी एसडी यांनी फेसबुकवर शेअर केल्यानंतर हा फोटो गेल्या आठवड्यात व्हायरल झाला आहे.
डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन व्हायरल
डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना एका प्रिस्क्राप्शनवर मोठ्या आणि सुवाच्या अक्षरात लिहून दिले, ज्यामुळे प्रिस्क्रिप्शन वाचण्यास खूप सोपे झाले. आणि त्या रुग्णाला देखील समजले. डॉ. नारायणन हे गेल्या तीन वर्षांपासून सीएचसीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी लहान वयातच चांगले हस्ताक्षर कौशल्य विकसित केले होते. "माझ्या हस्ताक्षराच्या सरावाने मला मदत झाली आणि माझा अभ्यास पूर्ण केल्यानंतरही मी लेखन शैली टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला," असे डॉ. नारायणन आवर्जून सांगतात.
प्रिस्क्रिप्शन स्पष्टपणे लिहिण्याचा सर्वतोपरी प्रयत्न - डॉक्टर
डॉ नारायणन यांनी त्रिशूर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) मधून एमडी पूर्ण केले. एशियानेटशी बोलताना डॉक्टर म्हणाले, “मी माझी प्रिस्क्रिप्शन मोठ्या अक्षरात लिहितो. इतर डॉक्टर अशा पद्धतीने न कळेल असे लिहून देतात, याचे कारण त्या डॉक्टरांनाच माहित असावं. मी व्यस्त असतानाही प्रिस्क्रिप्शन स्पष्टपणे लिहिण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. त्यामुळे रुग्ण अनेकदा या डॉक्टरांचे कौतुक करताना दिसतात.
आनंद महिंद्रा यांच्याकडून व्हिडीओ शेअर
या महिन्याच्या सुरुवातीला, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक लहान व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये असं दाखवण्यात आले आहे की, डॉक्टरांचे हस्ताक्षर गेल्या काही वर्षांत हळूहळू कसे खराब होत आहे. "डॉक्टर्स हँडरायटिंग विल बी" या शीर्षकाची 15 सेकंदांची क्लिप शिक्षणाचे विविध स्तर दर्शवते. व्हिडिओत असे दाखवण्यात आले की, इयत्ता 10 वी पासून ते एका तज्ज्ञ डॉक्टरपर्यंत, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी ते तज्ज्ञ बनण्यापर्यंत बारीक, गोलाकार हस्ताक्षर कसे बिघडत जाते
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)