Video Viral: सहा महिने केली बचत, शेतकरी स्कूटर खरेदीसाठी नाण्यांचं पोतं घेऊन शोरूममध्ये; दोन तास पैशांची मोजणी, व्हिडिओ व्हायरल
Video Viral: शोरूमच्या कर्मचाऱ्यांना ती मोजण्यासाठी जवळपास दोन तासभरापेक्षा जास्त वेळ लागला, परंतु हे दृश्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.

छत्तीसगड: छत्तीसगडमधील जशपूर (jashpur News) जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाने त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे दर्शन घडवले आहे. हे कुटुंब सहा महिन्यांची मेहनत आणि पैसे घेऊन नवीन स्कूटर खरेदी करण्यासाठी जिल्हा मुख्यालयातील देवनारायण होंडा शोरूममध्ये (jashpur News) पोहोचले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ४०,००० रुपयांच्या नाण्यांपैकी बहुतेक १० आणि २० रुपयांची नाणी होती, ही नाणी एका छोट्या पोत्यामध्ये आणली होती. शोरूमच्या कर्मचाऱ्यांना ती मोजण्यासाठी जवळपास दोन तासभरापेक्षा जास्त वेळ लागला, परंतु हे दृश्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.(jashpur farmer arrived with sack of coins
Video Viral: संपूर्ण कुटुंबाने पैसे वाचवण्यासाठी केले खूप कष्ट
या शेतकऱ्याचे नाव रामलाल यादव आहे, तो जशपूरजवळील बसंतपूर या लहानशा गावाचा रहिवासी आहे. रामलाल यांनी सांगितलं की, "आमचे कुटुंब शेतीवर अवलंबून होते. माझ्या मुलीच्या लग्नानंतर, आता माझ्या मुलाला त्याच्या अभ्यासासाठी स्कूटरची गरज होती. गेल्या सहा महिन्यांपासून, आम्ही प्रत्येकजण काम आणि कठोर परिश्रम केले, भाजीपाला विकला, मजूर म्हणून काम केले आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने योगदान दिले. आमच्याकडे कमी नोटा शिल्लक होत्या, म्हणून आम्ही नाणी जमा करण्यास सुरुवात केली. शेवटी, तो ४०,००० ची नाणी आणि उरलेल्या नोटा घेऊन शोरूममध्ये पोहोचला." रामलाल त्यांची पत्नी सुनीता, मुलगा अजय आणि मुलगी राणीसह शोरूममध्ये दाखल झाले. सोबत आणलेलं छोटं पोतं उघडताच शोरूममधील सगळेच आश्चर्यचकित झाले.
In Chhattisgarh's Jashpur, farmer buys honda activa for daughter and paid in coins.
— Vishnukant (@vishnukant_7) October 23, 2025
Bajrag Ram Bhagat saved 40 thousand rupees in coins and was finally able to gift her daughter a scooty.
What an emotional moment for the family, the video is pure love...
Jashpur is home to… pic.twitter.com/2eUKRzUA82
Video Viral: पोत्यात १० आणि २० रुपयांची २,५०० नाणी
शोरूमचे मालक आनंद गुप्ता यांनी या घटनेचे वर्णन "कठोर परिश्रमाचा आदर" असे केले आणि ते म्हणाले, "अशी समर्पण वृत्ती फोर दुर्मिळ आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी नाणी मोजण्यात दोन तासांपेक्षा जास्त वेळ घालवला." १०-२० रुपयांची २,५०० हून अधिक नाणी पोत्यांमध्ये आणण्यात आली. आम्ही स्कूटरची पूर्ण किंमत स्वीकारली आणि कुटुंबाला अतिरिक्त भेट म्हणून एक हेल्मेट सेट आणि सर्व्हिस व्हाउचर दिले. हे शेतकरी कुटुंब आमची प्रेरणा आहे." गुप्ता म्हणाले की, हे दृश्य शोरूमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Video Viral: मिक्सर ग्राइंडरही जिंकला
स्कूटर खरेदी करताना मिळालेले गिफ्ट कूपन स्क्रॅच झाले, तेव्हा रामलाल कुटुंबाला खूप आनंद झाला. रामलालचे कुटुंब एक नवीन स्कूटर आणि मिक्सर ग्राइंडर घेऊन परतले. सर्वांचे चेहरे समाधानाच्या हास्याने भरले होते. स्थानिकांनी याला "नाण्यांचा विजय" असे म्हटले आहे.
























