VIDEO: दुबईचा मॉल म्हणावा की मुंबई लोकल? iPhone 15 च्या खरेदीसाठी मॉलमध्ये चेंगराचेंगरी
Apple iPhone 15: दुबई मॉलमध्ये सकाळी 6 वाजता जेव्हा iPhone 15 ची विक्री सुरू झाली, तेव्हा मॉलचे दरवाजे उघडताच बाहेर थांबलेल्या लोकांनी आत पळ घेतला. सुरक्षा रक्षकांनाही लोकांना आवरणं कठीण झालं.
दुबई: Apple iPhone 15 सिरीज लॉन्च झाल्यापासून हा फोन खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ सुरू आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये या नवीन आयफोनची प्रचंड क्रेझ आहे. 22 सप्टेंबरपासून अनेक देशांमध्ये iPhone 15 ची विक्री सुरू झाली, तेव्हापासून अनेक देशांत लोकांनी आयफोनच्या खरेदीसाठी अॅपल स्टोअरबाहेर तुंबळ गर्दी केली.
काहींनी अॅपल स्टोअर सुरू होण्याआधीच स्टोअरबाहेर रांगा लावल्या. दुकान उघडताच लोक आयफोन खरेदीसाठी आत पळू लागले, याचे अनेक व्हिडीओ याआधी देखील व्हायरल झाले आहेत. आता असाच एक व्हिडिओ दुबईतून (Dubai) समोर आला आहे, यात नेमकं काय झालं? तुम्हीच पाहा.
हा दुबई मॉल की मुंबई लोकल?
दुबई मॉलमध्ये (Dubai Mall) सकाळी 6 वाजता जेव्हा iPhone 15 ची विक्री सुरू झाली. मॉलचे दरवाजे उघडताच क्षणी बाहेर थांबलेल्या लोकांनी लगेचच एकमेकांना धक्काबुक्की करत मॉलमध्ये धाव घेतली. आयफोन खरेदी करण्यासाठी लोक दुकानाकडे धावले. आयफोन खरेदी करण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे, असं ते दृश्य होतं.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही लोक दुकानाकडे धावताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अॅपल स्टोअरच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं तुम्ही पाहू शकता. लोक आयफोन खरेदी करण्यासाठी अक्षरश: चेंगराचेंगरी करुन अॅपल स्टोअरमध्ये पोहोचले.
Dubai mall at 6am
— desi mojito 🇮🇳 (@desimojito) September 25, 2023
Android users are more civilised than these iphone users 😭😭 pic.twitter.com/B8O79ii8YA
आयफोन खरेदीसाठी जमली गर्दी
दुबईमध्ये सकाळी 6 पासूनच आयफोनची डिलिव्हरी आणि विक्री प्रक्रिया सुरू झाली आहे. या फोनबाबत लोकांमध्ये वेगळीच एक्साईटमेंट होती. पहिल्याच दिवशी ज्यांना आयफोन मिळाला त्यांच्या आनंदाला काही सीमा नव्हती. आयफोन बाजारात आल्याच्या पहिल्याच दिवशी ज्यांना तो मिळाला, त्यांच्याकडे बघून असं वाटतं होतं जणू त्यांनी मोठा इतिहासच रचला.
दुबई मॉलमध्ये iPhone 15 ची विक्री सुरू होण्याच्या एक दिवस आधीपासूनच सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळीच जेव्हा मोठ्या संख्येने लोक दुकानाकडे येत असल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनाही टेन्शन आलं.
सुरक्षा रक्षकांनाही फुटला घाम
आयफोन खरेदीसाठी दुबई मॉलबाहेर पहाटे 5 पासूनच रांगा लागल्या. लोकांनी मॉलबाहेर तुफान गर्दी केली. गर्दी कमी करण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी लोकांना ऑनलाईन बुकिंगचा पर्याय दिला किंवा दुसऱ्या दिवशी दुकानातून आयफोन खरेदी करा, असंही आवाहन केलं. परंतु लोक काही ऐकायला तयार नव्हते.
व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये सुरक्षा कर्मचारी लोकांना थांबवतानाही दिसत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने लोक मॉलमध्ये घुसले की त्यांना रोखण्यात सुरक्षा अधिकारीही अपयशी ठरले.
The situation of dubai mall🤭😂 #iphone15 pic.twitter.com/iBBpp65MdV
— 99% (@yunesh_k) September 22, 2023
हेही वाचा:
Share Market: 'या' कंपनीच्या शेअरची किंमत सर्वाधिक; एका शेअरमधून खरेदी करु शकता 300 iPhone 15