एक्स्प्लोर

Share Market: 'या' कंपनीच्या शेअरची किंमत सर्वाधिक; एका शेअरमधून खरेदी करु शकता 300 iPhone 15

अनेक लोकांना एक iPhone खरेदी करतानाही विचार करावा लागतो, एक iPhone खरेदी केला तरी त्यांचं बजेट कोलमडतं. परंतु जगात एक कंपनी अशी आहे ज्याच्या एका शेअरची किंमत इतकी आहे की, त्यात तुम्ही एक-दोन नव्हे, तर तब्बल 300 iPhone 15 खरेदी करू शकता.

Highest Share Value: आयफोन 15 खरेदी करण्यापेक्षा अ‍ॅपलच्या शेअर्समध्ये (Apple Shares) पैसे गुंतवाल तर करोडपती व्हाल, असं सांगणारे अनेक लोक तुम्हाला भेटत असतील. पण तुम्ही कधी अ‍ॅपलच्या शेअरची किंमत चेक करायचा प्रयत्न तरी केला आहे का? या व्यतिरिक्त देखील जगात एक अशी कंपनी आहे, जिच्या एका शेअरची किंमत आज कोट्यवधींमध्ये आहे. या कंपनीच्या एका शेअरच्या किमतीत तुम्ही 300 आयफोन 15 (iPhone 15) खरेदी करु शकता.

जगात अशी एक कंपनी आहे जिच्या एका शेअरची किंमत (Share Price) 5.45 लाख डॉलर आहे. भारतीय चलनात बोलायचं झालं तर, या कंपनीच्या एका शेअरची किंमत सुमारे साडेचार कोटी रुपये आहे. या कंपनीचा शेअर जगातील सर्वात महाग शेअर्सपैकी (One Of World's Expensive Share) एक आहे.

वॉरन बफेशी कनेक्शन

तर हा शेअर बर्कशायर हॅथवे (Berkshire Hathaway) या कंपनीचा आहे, ज्याचे अध्यक्ष आणि सीईओ सध्या वॉरेन बफे (Warren Buffett) आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, वॉरेन बफेची एकूण संपत्ती सुमारे $120 अब्ज आहे. ते जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची ओळख ही एक यशस्वी व्हेंचर कॅपिटलिस्ट (Venture Capitalist) म्हणून आहे, ज्यांनी छोट्या-छोट्या बचत (Small Savings) आणि गुंतवणुकीतून (Investment) एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे.

खरेदी करू शकता 300 iPhone 15

बर्कशायर हॅथवेच्या शेअरची किंमत भारतीय रुपयात 4.5 कोटी रुपये आहे. iPhone 15 च्या Pro Max व्हर्जनची किंमत देखील जवळपास 1.59 लाख रुपये आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर, आज जर तुमच्याकडे बर्कशायर हॅथवेचा एक शेअर असता, तरी तुम्ही सुमारे 300 iPhone खरेदी करू शकला असता.

अ‍ॅपलच्या शेअरने होऊ शकता मालामाल

आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे, 2007 मध्ये जगातील पहिला iPhone लाँच झाल्यापासून तुम्ही आयफोनचे सर्व बेस मॉडेल्स खरेदी केले असतील, तर तुम्हाला कमीत कमी 6.3 लाख रुपयांचा खर्च आला असेल. पण हेच तुम्ही iPhone ऐवजी तुम्ही तेव्हापासून अ‍ॅपलचे शेअर्स खरेदी करत राहिले असते, तर या 6.3 लाख रुपयांचे आज 50 लाख झाले असते. आज तुम्ही 50 लाख रुपयांचे मालक बनला असता.

टीप: कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या

हेही वाचा:

iPhone 15 Series Price: महागड्या iPhone 15 ची मुंबईकरांमध्ये क्रेझ, खरेदीसाठी दुकानांबाहेर लोकांची तुफान गर्दी, 22 सप्टेंबरपासून विक्री सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget