India's First Ice Cafe : तब्बल 14 हजार फूट उंचीवर आहे भारतातील प्रथम 'आइस कॅफे'! एकदा पाहाच
India's First Ice Cafe : भारतातील पहिले नैसर्गिक बर्फ कॅफे लेह, लडाख येथेअसून पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
India's First Ice Cafe : लडाख हे सिंधू नदीच्या (Sindhu River) काठावर वसलेले एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. लडाखच्या बर्फाच्छादित टेकड्या आणि तिथल्या सुंदर दऱ्या खरोखरच आत्म्याला शांती देतात. मे 2019 मध्ये, भारतातील पहिले नैसर्गिक बर्फ कॅफे लेह, लडाख येथे उघडले असून पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
समुद्र सपाटीपासून 14000 फूट उंचीवर
हा कॅफे समुद्र सपाटीपासून 14000 फूट उंचीवर आहे. हे कॅफे मनाली-लेह हायवेवर आहे. हा आइस कॅफे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने नैसर्गिक प्रक्रियेतून तयार केला आहे. हिवाळ्यात पाण्याची बचत व्हावी आणि नंतर सिंचनासाठी वापरता यावा या उद्देशाने हा कॅफे गुहेच्या आकारात बांधण्यात आला आहे.
View this post on Instagram
कॅफेमध्ये खाण्यापिण्याची सुविधा
देशातील पहिल्या नैसर्गिक बर्फ कॅफेमध्ये मसाला चाय, आले-चहा, बटर-चहा आणि मसाला मॅगी मिळते. तो चार स्थानिक तरुणांच्या सहकार्याने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बनवला आहे. हा कॅफे बनवण्याची कल्पना यांत्रिक अभियंता सोनम वांगचुक यांच्या प्रकल्पातून घेण्यात आली आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला आईस कॅफेची झलक पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर travelrealindia नावाच्या अकाऊंटने पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे - 'भारताचा पहिला आइस कॅफे लडाखमध्ये आहे.' हा व्हिडिओ गेल्या महिन्यात पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओला 92 हजारांहून अधिक लोकांनी लाइकही केले आहे.