GK: आजकाल ट्रेनच्या खिडक्यांचा आकार मोठा का असतो? 'हे' आहे त्यामागील कारण
Indian Railway Train Coaches: आधीपेक्षा आता ट्रेनच्या डब्यांच्या खिडक्या मोठ्या होऊ लागल्या आहेत, हे तुमच्या कधी लक्षात आलं का? आता असं करण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घेऊया.
Indian Railway: भारतीय रेल्वे विविध वर्गातील प्रवाशांसाठी विविध प्रकारचे रेल्वे डबे (Railway Coach) तयार करत असते. प्रवाशांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी रेल्वेकडून (Railway) अनेक पावलं उचलली जातात. बदलत्या काळानुसार, रेल्वेने केवळ नेटवर्कच वाढवलं नाही, तर ट्रेनचे डबे देखील आलिशान आणि आरामदायी बनवण्याचं काम केलं आहे.
आता रेल्वे गाड्यांमध्ये अनेक प्रकारचे डबे आहेत, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास खूप आरामदायी होतो. याच अनुषंगाने रेल्वेच्या डब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे, रेल्वे डब्यात आता पूर्वीपेक्षा मोठ्या खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. रेल्वेने खिडक्यांचा आकार वाढवण्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होतो, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आलिशान रेल्वे गाड्यांच्या खिडक्या मोठ्या आकारात
विस्टाडोम आणि एलएचबी कोचमध्ये मोठ्या खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय या डब्यांमध्ये स्क्रूलेस मॉड्युलर इंटीरियर बसवण्यात आले आहेत, या खिडक्यांमध्ये पीव्हीबी फिल्म्सही बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय या खिडक्यांवर उष्णतारोधकतेसाठी (Heat Insulation) विशेष शीटही बसवण्यात आली आहे. यासोबतच कोचच्या खिडक्याही पूर्वीपेक्षा खूप मोठ्या करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या एका डब्यात 12 फिक्स्ड विंडो, 4 आपत्कालीन खिडक्या आणि 3 हॉपर विंडो बसवण्यात आल्या आहेत.
नेमक्या का बसवण्यात आल्या मोठ्या खिडक्या?
रेल्वेने कोणत्याही तांत्रिक कारणामुळे खिडकीचा आकार वाढवलेला नाही. प्रवाशांचा प्रवास अनुभव सुधारण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचललं आहे. रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रवाशांना विहंगम दृश्य (Panaromic View) देण्यासाठी ट्रेनच्या डब्याच्या खिडकीचा आकार वाढवण्यात आला आहे. उदाहरणार्थ, तुमच्या लक्षात आलं असेल की विस्टाडोम कोचमध्ये खूप मोठ्या खिडक्या आहेत, परंतु आता सामान्य कोचमध्ये देखील खिडक्यांचा आकार वाढवण्यात आला आहे. आता LHB कोचमधील खिडक्यांचा आकारही 1100 mm (L) x 680 mm (H) करण्यात आला आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेचे खास ‘विस्टाडोम कोच’
भारतीय रेल्वेने 44 सीट्सचा व्हिस्टाडोम कोच (Vistadome Coach) तयार केला आहे. हा कोच पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्याच्या उद्देशाने रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे.
काय आहेत या कोचची वैशिष्ट्यं?
विस्टाडोम कोचमध्ये (Vistadome Coach) मोठ्या काचा लावण्यात आल्या आहेत. ज्यातून प्रवासी त्यांच्या प्रवासादरम्यान बाहेरील दृश्य अर्थात निसर्गाचा आनंद घेऊ शकतील. या एका कोचमध्ये 44 जणांच्या बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. पर्यटकांच्या आरामदायी प्रवासासाठी सीटमध्ये एअर स्प्रिंग सस्पेंशन बसवण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त प्रवासी आरामात बसून निळंभोर आकाश पाहू शकतात, स्नॅक्स खाऊन बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. या प्रत्येक कोचमध्ये ‘लाँग विंडो लाऊंज’ आहे.
हेही वाचा: