(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काजू-बदाम नाही... 'हे' आहे जगातील सर्वात महाग ड्रायफ्रुट! फक्त एक-दोन तुकडेही ठरतात फायदेशीर
Cashew-Almond: जवळपास सर्वच लोकांना काजू आणि बदाम खायला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का, की हे जगातील सर्वात महाग ड्रायफ्रुट नाही. तर आज जगातील सर्वात महागड्या सुक्या मेव्याबद्दल जाणून घेऊया.
Pine Nuts Benefits: तुम्हाला असं वाटत असेल की, काजू-बदाम किंवा अक्रोड हे सर्वात महाग ड्रायफ्रुट (Dry Fruit) आहेत. पण तसं नाही. चिलगोजा, ज्याला पाईन नट्स (Pine Nuts) देखील म्हणतात, हा सर्वात महाग आणि तितकाच पौष्टिक ड्रायफ्रुटचा प्रकार आहे. पाईन नट्सची चवही स्वादिष्ट असते. पाईन नट्सचे अनेक फायदे आहेत, यामुळे तुमचं आरोग्य सुधारू शकतं. तर, पाईन नट्सचे काही महत्त्वाचे फायदे पाहूया.
लोहाचा पुरवठा (In iron deficiency)
पाईन नट्स लोहाचा एक चांगला स्रोत आहे, जो तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर करू शकतो. पाईन नट्समुळे रक्ताची कमतरताही भरुन निघते. रक्ताच्या कमतरतेमुळे होणारा एनिमिया देखील बरा होऊ शकतो.
हृदयाचे आरोग्य (For healthy heart)
पाईन नट्समध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास आणि रक्तभिसरण सुधारण्यास मदत करू शकतात. संशोधनानुसार, नट खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
मेंदूचे आरोग्य (For brain health)
पाईन नट्स ओमेगा-3 फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे, जे तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारू शकतात. यामुळे विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता वाढते आणि मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करते.
वजन नियंत्रण (In weight control)
वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही पाईन नट्स फायदेशीर आहे. यात पिनोलेनिक ऍसिड असतं, जे भूक नियंत्रित ठेऊन वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
आंशिक मधुमेह नियंत्रण (In diabetes)
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी पाईन नट्सचे सेवन फायदेशीर ठरू शकते, कारण त्यात धोकादायक उच्च ग्लायसेमिक निर्देशांक नसतो आणि रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास ते मदत करू शकतात.
अँटी-ऑक्सिडेंट्स (As anti-oxidents)
अँटिऑक्सिडंट्स आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. जर तुम्ही पाईन नट्स खात असाल तर त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स (व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई) तुमच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतील.
निरोगी हाडांसाठी (For healthy bones)
पाईन नट्स खाल्ल्याने हाडं मजबूत होतात, कारण त्यात असलेले फॅटी अॅसिड हाडांच्या विकासात आणि मजबूतीमध्ये मोठी भूमिका बजावतात. तसेच सांधेदुखीमध्ये आराम देतात.
कोलेस्टेरॉलसाठी (For cholesterol)
पाईन नट्स खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल संतुलित राहते, कारण त्यात कोलेस्ट्रॉल अजिबात नसते. पाईन नट्स खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका नसतो, उलट कोलेस्ट्रॉल कमी होते.
हेही वाचा:
बेडरुमजवळ फ्रिज असणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण? संशोधनातून समोर आलं कारण
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )