एक्स्प्लोर

VIDEO: मंच्युरियन खाण्याचे शौकिन आहात? तर आधी 'हा' किळसवाणा व्हिडीओ पाहाच...

Viral Video: कोबी मंच्युरियन बनवतानाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होतोय. यात कशा प्रकारे मंच्युरियन बनवलं जातं हे तुम्ही पाहू शकता.

Viral Video: कधीतरी कोबी मंच्युरियन (Manchurian) खाणं कुणाला आवडत नाही? जे लोक फास्ट फूड (Fast Food) खूप आवडीने खातात, त्यांना मंच्युरियन खाणं देखील फार आवडतं. बहुतेक लोकांना वाटत असेल की, मंच्युरियन स्वच्छतेची (Hygiene) नीट काळजी घेऊन बनवले जातात आणि त्यामुळे लोक आवडीने मंच्युरियन खातही असतील. पण तसं नाही. मंच्युरियन बनवताना किती वाईट पद्धत अवलंबली जाते, हे दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला तर आजपासूनच मंच्युरियन खाणं कायमचं बंद कराल.

ग्लोव्ह्स न घालता हातांनीच मिसळलं मिश्रण

मंच्युरियन बनवतानाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. मंच्युरियन कशा प्रकारे बनवले जातात हे तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. काही लोक चटई टाकून कोबीला बारीक-बारीक तुकड्यांत कापताना दिसत आहेत. मंच्युरियन बनवणाऱ्या लोकांनी हातात ग्लोव्ह देखील घातलेले नाही.

कोबीचे बारीक टुकडे करुन त्यांना कॅरेटमध्ये टाकलं जात आहे, ज्या कॅरेटमध्ये बरीच घाण देखील जमलेली आहे. त्यातून नंतर एका मोठ्या भांड्यात ही बारीक केलेली कोबी टाकली जाते.  यानंतर विविध प्रकारचे मसाले, मीठ आणि मैदा मिसळला जातो. हे सगळं झाल्यानंतर घामाटलेला अर्धा उघडा व्यक्ती त्याच्या हाताने हे मिश्रण एकजीव करतो. हे मिश्रण मिक्स करुन तो दुसऱ्या भांड्यात टाकतो, यानंतर छोटे-छोटे गोळे बनवून मंच्युरियन तळले जातात.

अस्वच्छतेचा कळस

जसं की आपण पाहू शकता, कोबी मंच्युरियन बनवतानाच्या या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणत्याही व्यक्तीने ना हातात ग्लोव्ह्स घातले, ना केस झाकण्यासाठी हेडकॅपचा वापर केला. आता जरा विचार करा, इतके अनहायजिनिक मंच्युरियन खाऊन तुमच्या आरोग्यावर त्याचा किती वाईट परिणाम होईल? तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की रस्त्यावर विकले जाणारे बरेच फास्ट फूड हे अशाच प्रकारे बनवले जातात, जे फक्त आपल्यासमोर तळून आपल्याला दिले जातात, पण या मागील प्रक्रिया आपल्याला माहीत नसते.

View this post on Instagram
 
A post shared by Raj Patel | Food Blogger (@the__bearded__foodie)

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहूल लोक हैराण झाले आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की, जितके जास्त तो अशा प्रकारचे व्हिडीओ पाहतो, तितकं बाहेरचे पदार्थ खाण्यावरुन त्याचं मन उठतं. तर दुसऱ्या एकाने म्हटलं की, घरात बनणाऱ्या पदार्थांमध्येच फक्त हायजिनची काळजी घेतली जाते.

हेही वाचा:

Health Tips: चपाती की भात? दोघांमधील शरीरासाठी जास्त फायदेशीर काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget