Viral Video : भररस्त्यातच फ्री स्टाईल राडा; लाथा, बुक्या, लाठ्या, काठ्यांनी एकमेकींना झोडलं
Girls Street Fight : सध्या ट्विटरवर तरुणींमधील फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Girls Fierce Street Fight Viral Video : सध्या सोशल मीडियावर हाणामारीचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी विमानातील प्रवाशांच्या भांडणाचा व्हिडीओ चर्चेत आला होता. बरं अशा फाईटमध्ये महिलांही काही कमी नाहीत, असं म्हणावं लागेल. कारण, अलिकडे लोकलमधील महिला डब्यातील हाणामारीचा व्हिडीओही प्रचंड चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा महिलांमधील अशाचा राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर तरुणींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भररस्त्यावर तरुणींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
या व्हिडीओमध्ये तुम्हाला भररस्त्यात तरुणींमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. रात्रीच्या वेळीची ही घटना आहे. तरुणी रस्त्यात एकमेकींवर लाथा, बुक्क्यांनी मारा करताना दिसत आहे. तरुणींनी लोळवून एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर एका तरुणीच्या हाता जाड लाकडी दांडा दिसत असून ती दुसऱ्या तरुणीला बेदम मारताना दिसत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
लड़कियों के बीच डंडों के साथ जमकर हुई मारपीट, वायरल वीडियो रुड़की का बताया जा रहा है।@haridwarpolice pic.twitter.com/xraOyDQQRb
— Vijay Pundir (@vip_pundir) December 25, 2022
रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने तरुणींची हाणामारी पाहून व्हिडीओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ विजय पुंदीर (Vijay Pundir) नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ उत्तराखंडमधील रुरकी येथील असल्याचे बोलले जात आहे.
व्हिडीओ पाहता मारहाण करणऱ्या तरुणी कॉलेजमधील असल्याचं सांगितलं जात आहे. ही हाणमारीची घटना उत्तराखंडमधील रुरकी येथील एका हॉटेलच्या शेजारी असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी घडली. पण ही घटना नेमकी कधी घडली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Viral Video : चार तरुणींचा मॉलमध्ये फ्री-स्टाईल राडा, 'WWE' फाईटचा व्हिडीओ व्हायरल