एक्स्प्लोर

Mumbai: शाहरुख खान लालबागच्या राजाच्या दर्शनाला; मुलगा अबराम खानसह बाप्पा चरणी लीन

Ganesh Chaturthi 2023: बॉलिवूडच्या किंग खानने आपल्या धाकट्या मुलासह मुंबईत 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेतलं आहे. शाहरुखच्या चाहत्यांकडून आता हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ganesh Chaturthi 2023: अभिनेता शाहरुख खानने गुरुवारी (21 सप्टेंबर) मुंबईतील 'लालबागच्या राजा'चं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं. यावेळी शाहरुखचा (Shahrukh Khan) धाकटा मुलगा अबराम खान (AbRam Khan) देखील त्याच्यासोबत होता. शाहरुखचा छोटा मुलगा अबराम हा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे, अबरामच्या गोड हास्यावर शाहरुखचे अनेक चाहते फिदा आहेत. बापलेकाच्या जोडीने 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेतल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांकडून आता हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.

शाहरुखनं वेधलं साऱ्यांचं लक्ष

यावेळी शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी (Pooja Dadlani) देखील त्यांच्यासोबत होती. शाहरुखने व्हाईट कुर्ता परिधान केला होता. एन्ट्री वेळी डोळ्यांवर गॉगल आणि मागे बांधलेल्या केसांच्या लूकने शाहरुखने सर्वांचं लश्र वेधून घेतलं. यावेळी नेहमीप्रमाणे चाहत्यांची मंडपात गर्दी देखील पाहायला मिळाली. शाहरुख मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्यानं भाविकांची उत्सुकता देखील शिगेला पोहचली होती.

मागील वर्षी फक्त धाकट्या मुलाने घेतलं दर्शन

2022 मध्येही गणेशोत्सवादरम्यान शाहरुखचा धाकटा मुलगा 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेण्यासाठी पोहोचला होता, त्यावेळी शाहरुख त्याच्यासोबत उपस्थित नव्हता. मात्र यंदा शाहरुख आणि अबराम यांनी एकत्र बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

लालबागचा राजा आणि सेलिब्रेटींचं नातं

बॉलीवूडचे सेलिब्रेटी (Bollywood Celebrity at Lalbaugcha Raja) आणि लालबागचा राजा यांचं नातं तसं बरंच जुनं आहे. दरवर्षी लालबागच्या राजाला मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित राहत असल्याचं दिसून आलं आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठमोठे सेलिब्रेटी हजेरी लावत आहेत. त्यात किंग खानच्या उपस्थितीनं हजारो भाविकांचं लक्ष वेधून घेतलं.

दोन दिवसांआधी कार्तिक आर्यननेही घेतलं दर्शन

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) देखील 19 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं, याचे फोटोही सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. कार्तिकने भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. कार्तिक आर्यनला पाहायला भाविक भक्तांची चांगलीच झुंबड उडाली होती. कार्तिकने पहिल्याच दिवशी सकाळी लवकर जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं.

हेही वाचा:

Riteish Genelia Deshmukh : लय भारी..! रितेश-जिनिलियाच्या मुलांनी 'रिसायकल बाप्पा' बनवत गायली आरती; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP MajhaUddhav Thackeray BJP Special Report : मोदी-ठाकरे भेटीतील 'तो' किस्सा, सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
Embed widget