Viral Video: दुकानावरील इंग्रजी पाटीवरील नावाचा मजेदार उल्लेख, नेमकं या महिलेने कसा केला उल्लेख तुम्ही पण पाहा
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पत्नीने दुकानावर लावलेल्या इंग्रजी पाटीचा हास्यास्पद उल्लेख केला आहे.
Viral Video: सोशल मिडियावर (Social Media) दररोज कितीतरी व्हिडीओ आपल्या समोर येतात. फावल्या वेळात सोशल मीडियावरील हे व्हिडीओ (Viral Video) पाहणं सगळेच जण पसंत करतात. त्यामुळे बऱ्याचदा मंनोरंजन देखील होते. सध्या असाच एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. या नवरा चक्क आपल्या बायकोच्या वाईट इंग्रजीची खिल्ली उडवत आहे. या व्हिडीओमधील महिला दुकानाच्या पाटीवर लिहीलेल्या इंग्रजी नावाचा फार मजेशीर उल्लेख केला आहे. हा उल्लेख एकून युजर्सना मात्र आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवता नाही आलयं.
या व्हिडीओमध्ये हे जोडपं (Viral Video) खरेदीसाठी बाजारात गेलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावेळी नवऱ्याने आपल्या फोनमध्ये त्याच्या बायकोचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकांउंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये पती आपल्या पत्नीची इंग्रजी बोलण्याची क्षमता आणि इंग्रजीचे स्पेलिंग येतात की, नाही ते तपासत आहे. त्यानंतर पती आपल्या पत्नीला दुकानावरील इंग्रजी पाटीवरील नाव वाचण्यास सांगतो. तेव्हा पत्नी त्या पाटीवरील नाव हे 'आंटी की इंडिया' असं वाचते. ज्यावर युजर्सना हसणं थांबवता येत नाही. खरं तर त्या दुकानाचं नाव असतं, 'अँटीक इंडिया'.
महिलेने दुकानाचे नाव चुकीचे वाचले...
हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर शिवा मधु नावाच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हे पती-पत्नी अनेकदा सोशल मीडियावर व्हिडीओ बनवताना दिसतात. या व्हिडीओमध्ये पत्नीचे उत्तर ऐकून नवरा हसला आणि सांगितले की, तिने 'आंटी का इंडिया' म्हणून जे सांगितले ते 'अँटीक इंडिया' असे लिहिले आहे. जे कळल्यावर बायकोही हसायला लागते. सध्या हा व्हिडीओ युजर्सचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
सोशल मिडियावर पसंती
हा व्हिडीओ सोशल मीडियावर 4.8 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला असून दोन लाख 33 हजारांहून अधिक युजर्सनी तो लाईक केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर हसण्यावर नियंत्रण न ठेवणारे युजर्स सतत कमेंट करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मिडियावर या जोडप्याला चांगलीच युजर्सकडून पसंती मिळत असल्याचं चित्र दिसत आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pushpa 2: रिलीज आधीच 'पुष्पा 2'नं केली कोट्यवधींची कमाई; 'बाहुबली 2' आणि 'आरआरआर' चं रेकॉर्ड तोडलं