कंडोमचा वापर करून फसवणूक, ठगाने लावला 63 हॉटेल्सना चुना
Hotel Condom Scam : कोण कशा पद्धतीने फसवणूक करेल हे सांगू शकत नाही. एका 21 वर्षांच्या तरुणाने वापरलेल्या कंडोमच्या माध्यमातून 63 हॉटेल्सची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : आपल्या अजूबाजूला फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. फसवणूक करणारे ठग अनेक प्रकारे शक्कल लढवतात. मात्र चीनमधील एका व्यक्तीने कंडोम आणि मृत झुरळांचा वापर करून अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. वापरलेल्या कंडोमचा वापर करून या व्यक्तीने जवळपास 63 हॉटेल्सना चुना लावल्याचं समोर आलं. हा व्यक्ती त्या हॉटेल्समध्ये राहायचा, सगळ्या सुविधाही घ्यायचा आणि वरती त्यांनाच ब्लॅकमेल करून पैसे उकळायचा. अशा प्रकारची फसवणूक करणारा आरोपी हा फक्त 21 वर्षांचा आहे.
चीनमधील हा तरूण कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. पण त्याला काही शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या या तरुणासमोर रोजचा दिवस कसा काढायचा असा प्रश्न होता. त्यावर त्याने एक शक्कल लढवली आणि त्या माध्यमातून त्याने अनेक हॉटेल्सची फसवणूक केली.
चेक इन केल्यानंतर फसवणूक करायचा
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, 21 वर्षीय तरुणाचे नाव सार्नेस जिआंग असं आहे. तो आधी एखाद्या हॉटेलमध्ये चेक इन करायचा. त्यानंतर सोबत आणलेले मृत झुरळ, वापरलेले कंडोम्स आणि इतर कचरा असलेल्या गोष्टी त्या हॉटेलमध्ये इतरत्र टाकायचा. चेक इन केल्यानतंर आपल्याला या गोष्टी दिसल्या, तुमच्या हॉटेल्सची सुविधा चांगली नाही असं सांगत तो त्याची तक्रार करण्याची धमकी द्यायचा.
या गोष्टीवरून तो मोठा आरडा-ओरडा करायचा आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करायचा. शेवटी हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्याकडूनच पैसे वसूल करायचा. गेल्या वर्षभरापासून तो 300 हून अधिक हॉटेलमध्ये थांबल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी 63 हॉटेल्समध्ये त्याने हा प्रकार केला आणि त्यांच्याकडून पैसे वसूल केल्याचं समोर आलं आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जियांगअनेक वेळा एकाच दिवसात तीन-चार हॉटेलमध्ये चेक इन करत असे. हॉटेलमधील छोट्या-छोट्या चुका तो निदर्शनास आणून देत असे. त्या ठिकाणी कचरा आहे, साफसफाई नाही, डास आणि किडे आहेत अशी तक्रार करायचा. ही गोष्ट माध्यमांच्या निदर्शनास आणून देईन असं सांगत धमकी द्यायचा. त्या बदल्यात तो हॉटेलमध्ये मोफत राहायचा आणि त्यांच्याकडूनच पैसे वसूल करायचा.
अशा प्रकारे त्याने अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं. हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांनीही भीतीपोटी त्याची तक्रार केली नाही. पण या तरुणाचे हे फसवणुकीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर मात्र त्याची चर्चा सुरू झाली. या प्रकरणी काही हॉटेल्सनी तक्रार केली. त्यानंतर अनेक हॉटेल्समध्ये हाच प्रकार झाला आणि त्याच तरुणाने हा प्रकार केल्याचं समोर आलं.
ही बातमी वाचा: