(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'बादल बरसा बिजुली...' गाण्यावर शाळेतील मुलाचे अफलातून ठुमके; नेटिझन्स प्रेमात, पाहा व्हिडीओ
Badal Barsa Bijuli Viral Dance: एका शाळेत 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यातील लहान मुलाचा कमाल हावभावासोबतचा डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Badal Barsa Bijuli Viral Dance: सोशल मीडियावर दररोज अनेक मनोरंजक आणि मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे लोकांना खूप आवडतात आणि लोक त्यावर खूप कमेंट देखील करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पश्चिम बंगालमधील एक शाळेतील छोटा मुलगा 'बादल बरसा बिजुली' या गाण्यावर धमाल डान्स करत आहे. हे तेच गाणं आहे ज्यावर नेपाळी मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला होता. आता याच गाण्यावर एका शाळेतील मुलाने केलेला डान्स देखील व्हायरल होत आहे.
शाळकरी मुलाने गाजवला मंच
व्हायरल होत असलेला व्हिडीओ शाळेतील एका कार्यक्रमाचा आहे. शिक्षक दिनानिमित्त शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या कार्यक्रमादरम्यान शाळेतील एक लहान मुलगा मंचावर नाचताना दिसत आहे, 'बादल बरसा बिजुली...' या गाण्यावर तो डान्स करत आहे. या लहानग्याच्या हटके ठुमक्यांनी अनेकांचं मन जिंकलं आहे. लहान मुलाचे डान्स मूव्ह पाहून तुम्हालाही मज्जा येईल. या मुलाचा धमाल डान्स पाहून खाली उभी असलेले इतर शाळकरी मुलंही जोमाने नाचू लागतात, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
View this post on Instagram
गोंडस मुलाचा डान्स प्रचंड व्हायरल
या आधीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये नेपाळमधील दोन मुलींनी ज्या स्टेप्स केल्या होत्या सेम तशाच स्टेप्स हा लहान मुलगा करताना दिसत आहे. एवढंच नाही तर या मुलाचे हावभावही पाहण्यासारखे आहेत. या गाण्यावर हा लहानगा पूर्ण आनंद घेऊन नाचत आहे आणि त्यामुळेच त्याचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
मुलाच्या या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. काही लोक कमेंट्समध्ये म्हणत आहेत की, या मुलाच्या डान्ससमोर साडी घालून मुलींनी केलेला डान्स देखील फेल आहे. बादल बरसा बिजुली... या गाण्यावर नेपाळमधील दोन बहिणींचा व्हिडिओ पहिल्यांदा व्हायरल झाला होता, त्यानंतर अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएर्सनी त्यावर डान्स केला होता, असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.
हेही वाचा: