Trending News : दृष्टीहीन आईला 20 वर्षांपासून तीर्थयात्रेला नेणारा 'श्रावण बाळ'; अनुपम खेर म्हणतात...
Trending News : आधुनिक 'श्रावण बाळा'चा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्यक्तीचं नावं कैलास असून ते 20 वर्षांपासून आपल्या आईला दृष्टीहीन आईची तीर्थयात्रेची इच्छा पूर्ण करत आहेत.
Anupam Kher Tweet : आपण सर्वांनीच लहानपणी श्रावण बाळाची गोष्ट नक्कीच ऐकली असेल. या कथेनुसार, श्रावण बाळाने आपल्या दृष्टीहीन आईवडिलांना कावडीत बसवून तीर्थयात्रा केली होती. याच श्रावण बाळाच्या प्रेरणेने आजही एक श्रावण बाळ त्याच्या आईला तीर्थयात्रेला नेत आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी या आधुनिक काळातील श्रावळ बाळाचा फोटो ट्विट करत शेअर केला आहे.
अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आधुनिक जगातील श्रावळ बाळाचा उल्लेख करण्यात आला आहे. माहितीनुसार, या फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती त्याच्या दृष्टीहीन आईला गेल्या 20 वर्षांपासून तीर्थयात्रेला नेत आहेत. अनुपम खेर यांनी श्रावण बाळाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अनुपम खेर यांनी ट्विट करत काय म्हटलं?
ट्विटरवर अभिनेते अनुपम खेर यांनी एक फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, या फोटोमध्ये दिसणारी माहिती फारच छान आहे. ही माहिती खरी असावी अशी आशा आहे. जर कुणालाही या व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळाल्यास कृपया माझ्यासोबत संपर्क साधावा. अनुपम केअर्स फाऊंडेशन त्यांना आयुष्यभर देशातील कोणत्याही तीर्थयात्रेसाठी सहाय्य करेल.'
The description in the pic is humbling! Pray it is true! So If anybody can find the whereabouts of this man please do let us know. The @anupamcares will be honoured to sponsor all his journeys with his mother to any pilgrimage in the country all his life. 🙏🕉 #MondayMotivation pic.twitter.com/Ec6dDE1QbN
— Anupam Kher (@AnupamPKher) July 4, 2022
20 वर्षांपासून सुरु आहे तीर्थयात्रा
मिळालेल्या माहितीनुसार, अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव कैलास गिरी आहे. त्यांच्या खांद्यावर कावडी दिसत आहे, ज्यामध्ये एका बाजूला त्यांच दृष्टीहीन आई बसली आहे आणि दुसऱ्या बाजूला सामान ठेवलं आहे. कैलास गिरी ब्रह्मचारी आहेत. त्यांना आधुनिक काळातील 'श्रावळ बाळ' म्हटलं जातं. ते आपल्या दृष्टीहीन आईची तीर्थयात्रेची इच्छा पूर्ण करण्यासाठी 80 वर्षीय आईला खांद्यावरील कावडीत बसवून फिरवत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या