Anand Mahindra : Mahindra Scorpio N ला मिळाले 5 स्टार! नेटकरी म्हणाले, रोहित शेट्टीला स्टंट सीनसाठी दुसरी कार शोधण्याची गरज, आनंद महिंद्रा म्हणाले....
Anand Mahindra : Mahindra Scorpio-N ने ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत 5 स्टार रेटिंग मिळवले आहे. यावर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत
Anand Mahindra : जेव्हापासून महिंद्राने Scorpio-N SUV लाँच केली, तेव्हापासून तिला SUV चा 'बिग डॅडी' म्हटले जात आहे. याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता ग्राहकांना या एसयूव्हीवर विश्वास ठेवण्याचे आणखी एक कारण मिळाले आहे. कारण, महिंद्रा स्कॉर्पिओ सुरक्षिततेच्या बाबतीतही एसयूव्हीचा बिग डॅडी असल्याचे सिद्ध झाले आहे. Mahindra Scorpio-N ने ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत 5 स्टार रेटिंग मिळवले आहे. यावर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. ज्यावर आनंद महिंद्रांनीही कमेंट करत, ही सर्वात मोठी Compliment..! असं म्हटलंय.
नेटकरी म्हणाले, रोहित शेट्टीला आता दुसरी कार शोधण्याची गरज
Mahindra Scorpio-N ने ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत 5 स्टार रेटिंग मिळवले आहे. यावर एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटले की, प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीला त्याच्या चित्रपटांमधील स्टंट सीनसाठी इतर कार शोधण्याची आवश्यकता आहे. कारण शक्तिशाली स्कॉर्पिओ ही सुपर सुरक्षित आहे. यावर आनंद महिंद्रांना देखील आनंद झाला असून ते म्हणाले, ही सर्वात मजेशीर आणि सर्वात मोठी स्तुती आहे, ज्याची आम्ही अपेक्षा करत आहोत.
That’s the funniest—and biggest—compliment we could ever hope to receive… https://t.co/7uaqxoy5Nl
— anand mahindra (@anandmahindra) December 12, 2022
5-स्टार रेटिंग मिळवणारी तिसरी SUV
ग्लोबल NCAP ने म्हटले आहे की SUV ने प्रौढ व्यक्ती संरक्षण चाचणीत 34 पैकी 29.25 गुण मिळवले आहेत, ज्यामुळे तिला पंचतारांकित रेटिंग मिळाले आहे. अशाप्रकारे, XUV700 आणि XUV300 नंतर, Scorpio-N ही महिंद्राची 5-स्टार रेटिंग मिळवणारी तिसरी SUV ठरली आहे. हे जून 2022 मध्ये लाँच करण्यात आले. 2020 मध्ये, महिंद्रा XUV300 SUV ही महिंद्राची 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळवणारी पहिली SUV होती. यानंतर, 2021 मध्ये, XUV700 ने 5 स्टार रेटिंग देखील मिळवले. याशिवाय, महिंद्रा थार आणि मराझो 4-स्टार रेटिंगसह येतात. अशाप्रकारे, महिंद्रा भारतात सुरक्षित SUV बनवण्यात आघाडीवर आहे.
किंमत आणि इंजिन
Mahindra Scorpio-N ची किंमत रु. 12 लाख पासून सुरू होते आणि रु. 24 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. यात 2.0-लीटर mStallion टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिन आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर एटी गिअरबॉक्स पर्याय आहेत.
Scorpio-N मधील सेफ्टी फीचर्स
6 एअरबॅग
ड्राइव्हप Drowsiness डिटेक्शन
इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC)
एबीएस + ईबीडी
हिल डिसेंट कंट्रोल
हिल होल्ड कंट्रोल
व्हीकल डायनामिक कंट्रोल
रोल ओवर मिटिगेशन
वेंटिलेटेड डिस्क ब्रेक (पुढे + मागे)
ISOFIX
टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम
फ्रंट - रियर कॅमेरा
फ्रंट - रियर पार्किंग सेंसर
एलईडी टर्न इंडिकेटर
एसओएस स्विच