Viral Video : जत्रेत घडली मोठी दुर्घटना, जास्त पैसे कमावण्याच्या नादात लोकांच्या जीवाशी खेळ; व्हिडीओ व्हायरल
Accident Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून युजर्सही भावूक होताना दिसले. काय आहे या व्हिडीओमध्ये?
Accident Viral Video : सोशल मीडीयावर (Social Media) अनेकदा असे व्हिडीओ पोस्ट करतात. जे पाहून युजर्स आश्चर्यचकीत होतात. आणि क्षणात ते व्हायरलही होताना दिसतात. अलीकडे असे अनेक अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यामुळे नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये जास्त पैसे कमावण्याच्या नादात लोकांच्या जीवाशी खेळ होताना दिसला, जो पाहून युजर्सही भावूक होताना दिसले. काय आहे या व्हिडीओमध्ये?
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
श्रावण महिन्यात देशातील विविध शहरांमध्ये जत्रा भरविल्या जातात. यामध्ये आपल्याय अनेक उंच उंच झुले दिसतात. विविध प्रकारचे हे अनोखे पाळणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. या झुल्याचा आनंद तसा प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जे पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. कारण हा व्हिडीओ अंगाचा थरकाप उडविणारा ठरला असून जत्रेतील आनंदी वातावरण काही क्षणातच तणावाचे बनते, असे काय घडते?
जास्त पैसे कमावण्याच्या नादात लोकांच्या जीवाशी खेळ
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जत्रेच्या सुरू असून त्यामध्ये एक झुला दिसत आहे, जो एखाद्या मोठ्या बोटीसारखा दिसतो. या झुल्याच्या मालकाने जास्त पैसे कमावण्याच्या नादात क्षमतेपेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये बसवले आहेत. पण आश्चर्य म्हणजे बसायला जागा नसतानाही लोकं त्यावर उभे राहताना दिसतात. त्यामुळे या झुल्याने वेग पकडताच त्यात बसलेले लोकं झुल्यावरून पडताना दिसले.
झुल्यावरून पडून लोकं जखमी
या व्हिडीओच्या शेवटी, सोशल मीडियावर वापरकर्त्यांना आश्चर्यचकित करून, तीनहून अधिक लोक एकत्र झुल्यावरून पडताना दिसत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला 82 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, आश्चर्यचकित नेटकरी यावर सतत प्रतिक्रिया देताना दिसतात.
इतर बातम्या
Mohali : जत्रेत 50 फूट उंचीवरून खाली कोसळला आकाश पाळणा, अनेक जण जखमी, थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल