(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : पावसाच्या पुरात रहिवासी कॉलनीत शिरली मगर, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
Viral Video : या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) एका रहिवासी कॉलनीत पावसामुळे पूर आला असताना मगर शिरल्याने (Crocodile in MP) कशी खळबळ उडाली होती.
Trending News : मध्य प्रदेशातील (MP) अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी अर्थात 14 ऑगस्ट रोजी तर अत्यंत जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. शिवपुरी जिल्ह्यात तर एक अत्यंत धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. एका रहिवासी कॉलनीत पूराच्या पाण्यासोबत चक्क मगर घुसल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाल्याचं दिसून आलं. या दरम्यानंचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल होत आहे.
या दरम्यान समोर आलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले असताना चक्क रहिवासी राहणाऱ्या एका भागात मगर शिरली असून ती सामान्य लोक फिरणाऱ्या भागातून जाताना दिसत आहे. व्हिडिओमध् हे देखील कळून येत आहे की लोक घाबरुन घरांच्या छतावर चढून बसले आहेत. सर्वचणज या मगरीला पाहून फार आश्चर्यचकीत होत असल्याचं दिसून येत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती नुसार, पोलीस उपविभागीय अधिकारी (SDOP) अजय भार्गव यांनी सांगितले की, ही मगर पहाटे जुन्या बसस्थानकाजवळील एका कॉलनीत दिसली होती, त्यानंतर अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.
पाहा व्हिडीओ-
Crocodile in shivpuri m.p pic.twitter.com/D2kVvDmlAH
— Pankaj Arora (@Pankajtumhara) August 14, 2022
रेस्क्यू टीमने पकडलं मगरीला
वसाहतीत खळबळ उडाल्यानंतर माधव राष्ट्रीय उद्यानातून बचाव पथक याठिकाणी पोहोचलं. ज्यानंतर तासाभराच्या प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात यश आले. या आठ फूट लांबीच्या मगरीला नंतर सांख्यसागर तलावात सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जवळून जाणाऱ्या नाल्यातून मगर वसाहतीत शिरली असावी, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा-