Pan Xiaoting: एकावेळी 10 किलो खाद्यपदार्थ खाण्याच्या सवयीने घात झाला, मकबँग Influencer पॅन शाउटिंगचा लाईव्ह शोदरम्यान मृत्यू
Mukbang influencer Pan Xiaoting died: पॅन शाउटिंग हिच्या मृत्यूमुळे दक्षिण कोरियातील मकबँग ट्रेंडविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मकबँग व्हीडिओतून तिला प्रचंड पैसे मिळायचे. मात्र, याच गोष्टीमुळे तिचा घात झाला.
बीजिंग: अलीकडच्या काळात सोशल मीडियावर मकबँग (Mukbang) इन्फ्लूएन्सर म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या पॅन शाउटिंग या 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पॅन शाउटिंग (Pan Xiaoting) 14 जुलैला नेहमीप्रमाणे लाईव्ह शो करत असताना हा प्रकार घडला होता.
गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण कोरियात मकबँग हा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाला आहे. या ट्रेंडनुसार इन्फ्लूएन्सर लाईव्ह स्ट्रिमिंग करुन मोठ्याप्रमाणावर खाद्यपदार्थांचे सेवन करतात. हे व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. पॅन शाउटिंग हीदेखील एक मकबँग इन्फ्लूएन्सर होती. तिने गेल्या काही वर्षांमध्य मकबँगचे व्हीडिओ तयार करुन सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. यामधून तिला प्रचंड पैसाही मिळाला होता.
पॅन शाउटिंग ही सुरुवातीच्या काळात रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करायची. तेव्हाच तिने मकबँगचे व्हीडिओ तयार करायला सुरुवात केली. या व्हीडिओमुळे तिला अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. ती एक फेमस इन्फ्लूएन्सर म्हणून ओळखली जाऊ लागली. तिला या सगळ्यातून प्रचंड पैसा मिळाला. याशिवाय, पॅनचे चाहतेही तिला अनेक भेटी पाठवायचे.
पॅन शाउटिंगला कोणती सवय नडली?
मकबँग व्हीडिओतून मिळणारी प्रसिद्धी आणि पैशांमुळे पॅन शाउटिंगने तिची नोकरी सोडून पूर्णवेळ इन्फ्लूएन्सर म्हणून कामाला सुरुवात केली. मात्र, सततच्या अतिखाण्याच्या सवयीने पॅनच्या तब्येतीवर परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिला याबद्दल समजावून सांगितले. मात्र, पॅनने मकबँगचे व्हीडिओ तयार करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन खाण्याची सवय सुरुच ठेवली.
पॅन शाउटिंग अनेकदा एका लाईव्ह स्ट्रिमिंगवेळी 10 किलो खाद्यपदार्थ खायची. कधीकधी ती सलग 10 तास खात राहायची. या घातक सवयीमुळे पॅन शाउटिंगला अनेकदा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. तिला गॅस्ट्रिक ब्लिडिंग झाल्याने अनेकदा तिची प्रकृती खालावली होती. तरीही पॅनने मकबँग व्हीडिओसाठी अतिखाण्याची सवय कायम ठेवली होती. या सवयीनेच अखेर तिचा जीव घेतला.
पॅनचा मृत्यू झाला तेव्हा तिचे वजन तब्बल 300 किलो होते. तिच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार, पोटातील पचन न झालेल्या अन्नपदार्थांमुळे आणि तिला शरीराच्या खालच्या बाजूची हालचाल करता येत नव्हती. याच कारणामुळे तिचा मृ्त्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा