Nagpur Covid Update: जिल्ह्यातील 64 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु, दिवसभरात 249 नव्या रुग्णांची नोंद
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीसह रुग्णालयात भरती होणाऱ्या बाधितांच्या संख्येचा आलेखही झपाट्याने वाढत आहे. गुरुवारपर्यंत 64 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
![Nagpur Covid Update: जिल्ह्यातील 64 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु, दिवसभरात 249 नव्या रुग्णांची नोंद Treatment on 64 corona patients in hospital 249 new patients have been registered in a day Nagpur Covid Update: जिल्ह्यातील 64 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु, दिवसभरात 249 नव्या रुग्णांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/08/073cb7e359553b0e95bec6c0134782b0_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूरः जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत असून आज दिवसभरात तब्बल 249 नव्या कोरोना (Covid) बाधितांची नोंद झाली. या नव्या बाधितांमध्ये शहरातील 159 शहरी तर 90 ग्रामीण बाधितांचा समावेश आहे. यासोबतच शहरातील सक्रिय बाधितांची संख्याही 939वर पोहोचली आहे. तर ग्रामीणमध्ये सध्या 447 कोरोना बाधित सक्रिय आहेत.
गुरुवारी 192 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 1386 सक्रिय कोरोना बाधित आहे. बाधितांपैकी 64 कोरोना बाधितांवर रुग्णालयात (Hospital) उपचार घेत आहेत. तर 1322 बाधित गृहविलगीकरणात आहेत. आज 1790 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आणि 411 रॅपिड अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या.
भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीसह रुग्णालयात भरती होणाऱ्या बाधितांच्या संख्येचा आलेखही झपाट्याने वाढत आहे. गुरुवारपर्यंत 64 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाधितांपैकी 12 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, 2 बाधित मेयोमध्ये, 10 बाधित किंग्सवे हॉस्पिटलमध्ये, 5 बाधित रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित लतामंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी येथे, 2 बाधित क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये, 5 बाधित वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये, 2 बाधित Aureus हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित एम्समध्ये, 2 बाधित सनफ्लावर हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित दंदे हॉस्पिटलमध्ये, 1 बाधित क्यूअर इट रुग्णालयात, 9 बाधित विवेका हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित स्वास्थयम हॉस्पिटलमध्ये आणि 4 बाधितांवर मेडीट्रिना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
चाचण्या वाढविण्याची गरज
गुरुवारी जिल्ह्यात 1790 जणांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी झाली. यापैकी फक्त 618 चाचण्या ग्रामीणमध्ये तर 1172 चाचण्या 25 लाखांची लोकसंख्या असलेल्या शहरात करण्यात आल्या हे विशेष. दुसरीकडे रॅपिड अॅन्टीजेन चाचण्यांचीही संख्या कमी झाली आहे. गुरुवारी ग्रामीणमध्ये फक्त 205 जणांची तर शहरात 206 जणांची रॅपिड अॅन्टीजेन (Rapid Antigen) चाचणी करण्यात आली. दररोजच्या तुलनेत ही आकडेवारी कमी आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णसंख्याही कमी होणार हे निश्चितच. मात्र वाढत्या रुग्णसंख्येसह प्रशासनाने टेस्टिंगची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. सध्या शहरातील सक्रिय बाधितांपैकी 1386 बाधित गृहविलगीकरणात आहेत.
Coronavirus Cases in India : देशात कोरोना प्रादुर्भावात पुन्हा वाढ; गेल्या 24 तासांत 21 हजार 566 नवे रुग्ण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)