Investment In Mutual Fund: 7-5-3-1 हा नियम SIP द्वारे इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा सोपा मार्ग; जाणून घ्या कसा
Investment In Mutual Fund: फंड इंडियाचा 7-5-3-1 नियम अतिशय सोपा आणि प्रभावी आहे. या नियमाचे पालन केल्याने, तुम्ही एक चांगले इक्विटी एसआयपी गुंतवणूकदार होऊ शकता.
Investment In Mutual Fund : सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण, तरीही आपल्यापैकी बरेचजण हे जास्त गुंतागुंतीचं करतात. त्यामुळे यातून मार्ग काढण्यसाठी आम्ही तुमच्यासाठी फंड्स इंडियाचा 7-5-3-1 नियम आणला आहे. हा नियम अतिशय सोपा आणि प्रभावी आहे. या नियमामुळे तुम्ही एक चांगला इक्विटी एसआयपी गुंतवणूकदार होऊ शकता.
7-5-3-1 नियम काय आहे?
1. गुंतवणुकीची 7+ वर्षांची मुदत ठेवा
शेअर मार्केट सहसा सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीत चांगली कामगिरी करतात. गेल्या 22 वर्षांमध्ये, एक वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यावर, 58 टक्के कालावधीत निफ्टी 50 TRI ने 10 टक्के पेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. पण, जर गुंतवणूक 7 वर्षांच्या कालावधीसह केली गेली असेल, तर 22 वर्षांतील 80 टक्के कालावधी अशा आहेत की इक्विटी मार्केटमधून 10 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.
याशिवाय, 7 वर्षांच्या कालावधीत बाजारातील वाईट स्थिती असूनही, गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा मिळालेला नाही. सर्वात वाईट परिस्थितीतही गुंतवणूकदारांनी किमान 5 टक्के वार्षिक परतावा मिळवला आहे. म्हणून, तुमच्या इक्विटी SIP गुंतवणुकीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी 7 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.
2. 5 फिंगर फ्रेमवर्कद्वारे तुमच्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा
जेव्हा आपण केवळ मागील परताव्याच्या आधारावर गुंतवणूक करतो, तेव्हा आपला पोर्टफोलिओ विशिष्ट थीमवर अवलंबून असतो. आणि जेव्हा अशा थीम्सचा काळ जेव्हा संपतो, तेव्हा तुमचा संपूर्ण पोर्टफोलिओ बराच काळ (Underperform) करू लागतो.
म्हणूनच, मोठ्या मुदतीसाठी चांगला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी विविध गुंतवणूक मार्ग आणि मार्केट कॅपद्वारे तुमच्या पोर्टफोलिओ अधिक आकर्षित बनवा. ज्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
'5 फिंगर फ्रेमवर्क'चे उद्दिष्ट दीर्घ कालावधीत कमी डाउनसाइड्ससह सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा आहे. गुणवत्ता, मूल्य, वाजवी किंमतीत वाढ, मिड आणि स्मॉल कॅप आणि वेगवेगळ्या वेळी जागतिक कारणांवर आधारित गुंतवणुकीचे निर्णय घेत इक्विटी फंडांमध्ये पोर्टफोलिओवर गुंतवणुकीचा निर्णय घेतात.
3. अपयशाच्या 3 सामान्य कारणांसाठी मानसिकदृष्ट्या तयार रहा
इक्विटी मार्केटने ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घ कालावधीत उत्कृष्ट परतावा प्रदान केला असला तरी, सुरुवातीच्या वर्षांमध्ये अपयशाच्या तीन टप्प्यांत टिकून राहणं हे खरं आव्हान आहे.
1. निराशेचा टप्पा - जेथे परतावा (7-10%) उपलब्ध असतो.
2. चिडचिडेपणा - जिथे परतावा आपल्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी (0-7%) असतो.
3. पॅनिक फेज - जेथे परतावा नकारात्मक (0% च्या खाली) पोहोचतो.
इक्विटी मार्केटमधील चढ-उतारांमुळे हा टप्पा निर्माण होतो. भारतीय शेअर बाजाराचा गेल्या 42 वर्षांपेक्षा जास्त काळचा इतिहास असे सांगतो की, जवळपास दरवर्षी बाजारात 10-20% ची तात्पुरती घसरण होते आणि दर 7-10 वर्षातून एकदा बाजारात 30-60% घसरण होते.
तुमच्या SIP गुंतवणुकीचे सुरुवातीचे काही वर्ष फार कठीण असू शकतात. कारण अधूनमधून बाजारातील घसरणीमुळे इक्विटी रिटर्न्समध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते ज्यामुळे निराशा, चिडचिड आणि भीती निर्माण होते. पण, ही घसरण तात्पुरती आहे हेही लक्षात घ्या. कारण, इक्विटी मार्केट 1-3 वर्षांमध्ये सुधारते आणि चांगले परतावा देखील देते.
4. प्रत्येक 1 वर्षानंतर तुमची SIP रक्कम वाढवा!
तुमच्या इक्विटी एसआयपी गुंतवणुकीच्या रकमेत दरवर्षी थोडीशी वाढ केल्यास दीर्घ कालावधीत तुमच्या पोर्टफोलिओच्या रकमेत मोठा फरक पडू शकतो.
दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवल्यामुळे तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. जसे की,
● तुमची आर्थिक उद्दिष्टे लवकर साध्य करता येतात.
● आर्थिकदृष्ट्या उद्दिष्टे वाढवणे (उदा. तुम्ही 2 BHK ऐवजी 3 BHK घर खरेदी करू शकता.)
20 वर्षांच्या SIP च्या पोर्टफोलिओ मूल्यामध्ये 10% वार्षिक वाढ सामान्य SIP द्वारे दरवर्षी गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट परतावा देते.
महत्त्वाच्या बातम्या :