एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा 'उत्तर भारतीय मेळावा', उद्धव ठाकरेंचा उत्तर भारतीय मतांवर डोळा

आगामी ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टिकोनातून हा ठाण्यातील उत्तर भारतीय मेळावा महत्त्वाचा असणार आहे.

मुंबई:  शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असताना दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावे आणि विभागवार बैठकांना सुद्धा सुरुवात केली आहे. येत्या 22 जुलैला ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्तर भारतीयांचा मेळाव्याचे आयोजन ठाकरे गटाकडून करण्यात  आले आहे. या मेळाव्याला स्वतः उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात हा उत्तर भारतीयांचा मेळावा होणार आहे. 

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी कंबर कसली

आगामी काळात राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. राज्यात सर्व महापालिकांत प्रमाणे विशेष म्हणजे  शिंदेच्या ठाण्यातील महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक पक्ष आपल्या परीने या निवडणुकीची रणनीती आखत कामाला लागले आहे. त्यात शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे.फेब्रुवारी महिन्यात गोरेगाव येथे उद्धव ठाकरे यांनी अशाच प्रकारे उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात हा मेळावा घेण्याचे नियोजन ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या अगोदर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जैन आणि गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती त्यानंतर उत्तर भारतीय मेळाव्याचे मुंबईत आयोजन केले होते. 

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उत्तर भारतीयांचा मेळावा

आगामी ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टिकोनातून हा ठाण्यातील उत्तर भारतीय मेळावा महत्त्वाचा असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात विदर्भातून केली होती.  त्यांनी भाजपचा आणि फडणवीसांचा बालेकिल्ला असलेल्या  नागपूरमध्ये सभा देखील घेतली होती. त्यानंतर आता थेट एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात हा उत्तर भारतीयांचा मेळावा होणार आहे. 

हिंदी भाषिक मतदारांना वळवण्यासाठी प्रयत्न

मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि इतर पक्ष आतापासूनच तयारीला लागलेत. मुंबई, ठाण्यात सर्वच भाषिक  मतदार असल्याने त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यात शिवसनेने आगामी महापालिका निवडणुकीसाठी  योग्य अभ्यास करून प्रांत, भाषा, संस्कृती,मुंबईकरांचे प्रश्न  या आदी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कळते. 

आगामी काळात  महापालिका निवडणुकीसाठी हिंदी भाषिक मतदारांना वळवण्यासाठी सर्वच पक्षांना प्रयत्न करावे लागणार आहेत हे स्पष्ट आहे.हिंदी भाषिकांची वाढती संख्या, वाढते हिंदी भाषिक नगरसेवक, यातच राजकीय पक्षांच्या वादात होत असलेले मतांचे विभाजन हे आपल्याच पथ्यावर कसे पडेल याचीच चाचपणी उध्दव ठाकरे आणि त्यांचा पक्षा मार्फत आता मेळाव्या निमित्त केली गेलीय असे म्हटले तरी राजकीयदृष्ट्या वावगे ठरणार नाही.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
Kalyan Land Scam : कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget