(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारी आणि शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार
Thane News : ठाण्यात ( 24 आणि 25 मार्चला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन विभागातील नागरिकांना केले आहे.
Thane Water Cut : ठाण्यच्या पाणीपुरवठ्याबाबत (Thane Water Cut Nws) मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यात शुक्रवारी आणि शनिवारी (24 आणि 25 मार्च) पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामामुळे ठाण्यातील काही विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. ठाण्यात (Thane News) 24 आणि 25 मार्चला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन विभागातील नागरिकांना केले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरुत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी (24 आणि 25 मार्च) दुपारी 12 पर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
ठाण्यातील 'या' भागात राहणार पाणी बंद (Thane Water Cut)
या कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, मुंब्रा प्रभाग समिती मधील वाय जंक्शन ते मुंब्रा फायर ब्रिगेड परिसरापर्यंत व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
पाणी जपून वापरण्याचं आवाहन
ठाणे महानगरपालिकेने बाधित भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे आणि शटडाऊन दरम्यान महामंडळाला सहकार्य करावे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. पाणी कपातीच्या कालावधीत ठाणेकर नागरिकांची गैरसोय होणार आहे. पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
उन्हाळ्यातील पाणी वितरणाचा कृती आराखडा तात्काळ तयार करण्याचे आदेश
रात्री-अपरात्री पाणी सोडणे म्हणजे महिलांच्या स्वास्थ्याशी खेळण्यासारखे असल्याने त्यांच्या सोयीनुसार पाणी वितरणाची वेळ असावी आणि पाणी पुरवठ्याबद्दल कोणतीही तक्रार आली तर ती विनाविलंब दूर करण्यासाठी अभियंत्यांनी संवेदनशीलता दाखवावी, त्याचबरोबर उन्हाळ्यातील पाणी वितरणाचा कृती आराखडा तात्काळ तयार करण्याचे आदेशही आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिले होते.