एक्स्प्लोर

सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार, उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत; एकनाथ शिंदेंची टीका

Thane Loksabha Election 2024: युवकांनी बाहेर येवून मतदान करावे, असं आवाहन देखील एकनाथ शिंदेंनी केलं. 

Thane Loksabha Election 2024: राज्यात आज लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 

मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावे. काही ठिकाणी तांत्रिक अडचण आल्या होत्या, त्या दूर झाल्या आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. बोगस मतदान करण्याची आम्हाला गरज नाही, ज्यांना पराभव दिसतोय ज्यांनी हत्यारं टाकली आहेत. त्यांना अशी वक्तव्य सुचतायेत, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी यावेळी विरोधकांवर केली. 

⁠फतवे काढणे ही आश्चर्यकारक आहे, असं घडणं चुकीचं आहे. विकास आम्ही करतोय. कोणत्या जातीला धर्माला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करतायेत. जे 50-60 वर्षे काँग्रेसला करता आले नाही, ते नरेंद्र मोदींनी केले. युवा पिढी देश घडवणारी पिढी आहे. त्यांचेयासाठीच आम्ही काम करतो, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. युवकांनी बाहेर येवून मतदान करावे, असं आवाहन देखील एकनाथ शिंदेंनी केलं. 

उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत- मुख्यमंत्री शिंदे

ठाणे कल्याण भिवंडी हा युतीचा बाले किल्ला आहे. ठाणे पालघर आणि मुंबई या जिल्ह्यातील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही परत आणणार, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत. आता त्यांची तोंड फुटतील, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला. 

महाराष्ट्रातील हायव्होल्टेज लढती 

मुंबई उत्तरः पीयूष गोयल (भाजप) भूषण पाटील (काँग्रेस) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.
मुंबई उत्तर मध्य: उज्ज्वल निकम (भाजप) वर्षा गायकवाड (काँग्रेस) मधून निवडणूक लढवत आहेत.
मुंबई दक्षिणः अरविंद सावंत (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यामिनी जाधव (शिवसेना) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.
मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना) यांची अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याशी लढत आहे.
मुंबई उत्तर-पश्चिम: रवींद्र वायकर (शिवसेना) हे अमोल कीर्तिकर (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
मुंबई ईशान्य: संजय दिना पाटील (शिवसेना उद्धव ठाकरे गट) मिहीर कोटेचा (भाजप) येथून निवडणूक लढवत आहेत.
कल्याण : वैशाली दरेकर-राणे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्या विरोधात डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना) लढत आहेत.
ठाणे : राजन बाबुराव विचारे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) नरेश म्हस्के (शिवसेना) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.
भिवंडी : कपिल मोरेश्वर पाटील (भाजप) सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी) कडून निवडणूक लढवत आहेत.
पालघर: हेमंत सवरा (भाजप) यांची भारती कामडी (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याशी लढत आहे.
धुळे : भामरे सुभाष रामराव (भाजप) येथून शोभा दिनेश (काँग्रेस) निवडणूक लढवत आहेत.
दिंडोरी : भास्कर मुरलीधर भगरे (शरद पवार गट) यांच्याकडून डॉ. भारती प्रवीण पवार (भाजप) निवडणूक लढवत आहेत.
नाशिक : हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) हे राजाभाऊ वाजे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Land Scam : कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget